भिवंडीतील तरुणाच्या हत्ये प्रकरणी  सात जणांना पोलिसांनी केली अटक

भिवंडी

भिवंडी ( प्रतिनिधी )भिवंडी शहरात अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्यास बेदम मारहाणी मुळे त्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे  त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असुन या प्रकरणी भिवंडी शहर पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपी शिवसेना उपशहरप्रमुख कैलास धोत्रे यासोबत दोघा आरोपींना रात्री उशिरा अटक केली आहे.तर एका आरोपीस भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केल्याने आता एकूण सात जणांना या गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
भिवंडीत 14 फेब्रुवारी रोजी शुल्लक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी नंतर शिवसेना उपरप्रमुख कैलास धोत्रे त्याचा मुलगा देवा व इतर साथीदारांनी संकेत भोसले या अल्पवयीन युवकास बेदम मारहाण केल्याने जबर जखमी झाला होता.या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल होते.उपचारा सुरू असताना संकेत याचा मृत्यू झाला.त्या नंतर पोलिसांनी संकेत भोसले यास जबर मारहाण करून हत्या केल्याच्या गुन्ह्यात कैलास धोत्रे याचे साथीदार करण लष्कर,दिनेश मोरे आणि चंदन गौड यांना या पूर्वी अटक केली होती.तर आता हत्येचा गुन्हा दाखल झाल्या नंतर शहर पोलिसांनी या गुन्ह्यातील पळून गेलेले मुख्य आरोपी  कैलास धोत्रे,आकाश जाधव,विशाल साबळे यांना अटक केली आहे.तर भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने ओम लोंढे यास अटक केली आहे.या गुन्ह्यातील एकूण सात गुन्हेगारांना आतापर्यंत अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.अजून काही फरार आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.आज दुपारी कैलास धोत्रे,आकाश जाधव,विशाल साबळे यांना भिवंडी न्यायालयात हजर केले असता या तिघांना 26 फेब्रुवारी पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *