भिवंडी ( प्रतिनिधी ) आगामी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव,धुलीवंदन व होळीचा सण आनंदात व उत्साहात संपन्न होण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्कपणे काम करीत असून नागरिकांनी सुद्धा सतर्क राहून व कायद्याचे पालन करून हे धार्मिक उत्सव व सण संपन्न करावे असे आवाहन ठाणे सह पोलीस आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांनी भिवंडीत रूट मार्च प्रसंगी केले आहे.
मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सुरू आहे.त्याचबरोबर भिवंडी शहर परिसरात होलिका उत्सव, धुलीवंदन व शिवजयंतीचा उत्सव संपन्न होणार आहे या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशानुसार रविवारी सायंकाळी ठाणे सह पोलिस आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांनी भिवंडीत येऊन पोलीस बंदोबस्त कामकाजाचा आढावा घेतला.यावेळी भिवंडी पोलीस उपाआयुक्त श्रीकांत परोपकारी, एसीपी दिपक देशमुख,सचिन सांगळे व सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते.यावेळी त्यांनी शहरातील संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शांतीनगर परिसराची पाहणी करून पोलीस पथकासह गायत्री नगर चौक येथून पायी रूट मार्च सुरू केला शांतीनगर रोड भाजी मार्केट,फातमा नगर,नागांव केजीएन चौक,शांतीनगर पोलीस चौकी ते कचेरी पाडा,कल्याण रोड, धर्मवीर स्व.आनंद दिघे चौक,कॉटर गेट मशिद – तिनबत्ती रोड ते निजामपूर पोलीस ठाण्यात येऊन त्यांनी रूट मार्च समाप्त केला.त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली.