भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी तालुक्यातील दुगाड गावातील गौरी चंद्रकांत जाधव हिची देशाच्या सशस्त्र सीमा दलात निवड झाली आहे.त्यामुळे या निवडीने परिसरातील दुगाडगाव व दुगाडफाटा ग्रामस्थां मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.गौरी ही आपल्या दुगाड गावात परतल्या नंतर दुगाड फाटा येथे भिवंडी वोरियर व सैनिक फेडरेशन ठाणे यांच्यावतीने तिचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली होती.

सैनिक फेडरेशनचे प्रदेश महासचिव डी एफ निंबालकर,ठाणे जिल्हाध्यक्ष राजू पाटील,सोशल वॉरियर्स फाउंडेशन भिवंडीचे जगदीश पाटील,अनिल सुंडकर,पोलीस उपनिरीक्षक आशिष भगत,फुलसिंह सोलंकी,माजी सैनिक जयदीप भोईर,
बीएनएन महाविद्यालयाचे एनसीसी विभाग प्रमुख कॅप्टन सुरेश जाधव यांच्यासह एनसीसी केडेट्स व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सशस्त्र सीमा दल हे नेपाळ आणि भूतानच्या सीमेवर तैनात केलेले भारताचे सीमा सुरक्षा दल अशा महत्वाच्या जागी भिवंडीतील ग्रामीण भागातील एका मुलीची निवड झाली हि आमच्या संपूर्ण गावकऱ्यांची गौरवास्पद बाब आहे अशी प्रतिक्रिया उपस्थित ग्रामस्थांनी दिली आहे.