भिवंडी पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाईत पकडलेल्या तिघा जणांकडून रिक्षा दुचाकी सह घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल

भिवंडी

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहरात वाहन चोरीच्या घटना होत असल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली असुन शांतीनगर पोलिस पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे केलेल्या तीन वेगवेगळ्या कारवाईत तिघा सराईत चोरट्यांना अटक करण्यात यश मिळवले असून त्यांच्या जवळून चार रिक्षा,सहा मोटर सायकल व एक मोबाईल फोन असा लाखो रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.
याबाबत पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
    भिवंडी शहरातील वाढलेल्या मोटरसायकल चोरीच्या घटनांचा शोध घेण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांनी भिवंडी पोलिसांना दिले होते.त्यामुळे पोलीस उपाआयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर,गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक विक्रम मोहिते यांचे विशेष तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे,पोलिस हवालदार संतोष मोरे,रिजवान सैय्यद, श्रीकांत धायगुडे,किरण मोहिते, दिपक सानप, रूपेश जाधव,
मनोज मुके,प्रशांत बर्वे यांना मिळालेल्या माहिती नुसार नाशिक मालेगाव येथील संशयित इसम मोहम्मद अरफाद मोहम्मद आरीफ अन्सारी (वय 21,रा. मालेगांव,जि नाशिक ) हा भिवंडी परिसरात येवून रिक्षा चोरी करीत असल्याचे समजल्याने त्याचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेत त्याचेकडे कसून तपास केला असता त्याने भिवंडी,मानपाडा डोंबिवली व मालेगांव,
नाशिक अशा वेगवेगळ्या शहर परिसरातुन चोरी केलेल्या एकूण चार रिक्षा व एक मोटरसायकल चोरी केल्याचे चौकशी तपासात निष्पन्न झाले.दुसऱ्या घटनेत शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीतील तडीपार असलेला आरोपी मकसुद दस्तगीर अंसारी (वय 22,रा.न्यु आझाद नगर)भिवंडी यास ताब्यात घेवुन त्याच्या कडे केलेल्या तपासात त्याने शांतीनगर,निजामपूर,भिवंडी शहर पोलिस ठाणे हद्दीतून चोरी केलेली एकूण चार पाच दुचाकी जप्त करण्यात यश मिळवले आहे.तर तिसऱ्या घटनेत सराईत गुन्हेगार जुनैद उर्फ गुलाब अहमद मोहम्मद हनीफ शहा (वय.20,रा.गायत्रीनगर) यास ताब्यात घेवुन त्याचेकडे केलेल्या चौकशीत त्याने शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीत एका मोबाईल फोन चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यात यश मिळवले आहे. पुढील तपास वपोनि शंकर इंदलकर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *