भिवंडीतील जिल्हा प्रमुख चषक ,जय हनुमान भावाळे यांनी जिंकला

भिवंडी

डॉ.देवानंद थळे यांच्या उपस्थितीत क्रिकेट स्पर्धा संपन्न.

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी तालुक्यातील खारबाव येथील
” जाणता राजा क्रिकेट संघ ” यांच्यावतीने युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कालवार गांव येथील मैदानात ‘जिल्हा प्रमुख चषक २०२६’ क्रिकेट स्पर्धा आयोजित केली करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील क्रिकेट संघांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपल्या खेळाचे प्रदर्शन केले हे क्रिकेट सामने पाहण्यासाठी मोठ्या संख्येने स्थानिक ग्रामस्थांसह युवक व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.


भिवंडी तालुक्यातील खारबाव येथील जाणता राजा क्रिकेट संघाचे वतीने दरवर्षी युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येतात यंदा सुध्दा दि.२ ते गुरूवार.५ फेब्रु.२०२६ दरम्यान जिल्हा प्रमुख चषक २०२६ क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख डॉ.देवानंद थळे उपस्थित होते.त्यांच्या हस्ते टॉस उडवून सामन्याची सुरुवात करण्यात आली यावेळी शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख रमेश तरे,विजय म्हात्रे,जिल्हा परिषद माजी सदस्य गोकुळ नाईक यांच्या सह स्थानिक ग्रामपंचायत सदस्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आयोजकांनी सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन डॉ. देवानंद थळे यांचा स्वागत सत्कार केला.अत्यंत चुरशीच्या क्रिकेट स्पर्धेचे जय हनुमान भावाळे हा संघ
प्रथम पारितोषिक विजेता ठरला तर जाणता राजा खारबाव हा द्वितीय पारितोषिक विजेता संघ म्हणून पारितोषिक मिळवले.चवठा हिरवा (माणकोली तृतीय पारितोषिक विजेता) देवानंद थळे प्रतिष्ठान (गावदेवी वेहेळे चर्तुथ पारितोषिक विजेता) विजेंद्र पाटील (बेस्ट बॅटर) चेतन तरे  (बेस्ट बाॅलर) विनित माळी (मॅन ऑफ दि सिरिज) विजेत्यांना सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.क्रिकेट स्पर्धा
कार्यक्रमाचे समालोचक डाॅ.मोरेश्वर गवळी,संदिप गावंड,शैलेश मांजरेकर,सुभाष धुमाळ यांनी केले. तर पंच म्हणून भाऊ पाटील,प्रल्हाद पाटील,निकलेश बजागे,आतिष पाटील यांनी केले ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी अथक परिश्रम घेतले.क्रिकेट सामना पाहण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *