भिवंडी ( प्रतिनिधी ) गुजरात येथील दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस ) गेल्या तीन दिवसांपूर्वी भिवंडी शहरातील नदीनाका परिसरात गोपणीय पध्दतीने धडक मोठी छापा मारी कारवाई करीत सुमारे 800 कोटी रुपये किमतीचा 792 किलो लिक्विड एमडी ड्रग पावडरचा साठा जप्त करीत दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.
मोहम्मद युनूस आणि मोहम्मद आदिल असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नांवे आहेत.कारवाई झाल्यानंतर दोन दिवसांनी याची वाच्यता करण्यात आली आहे. तोपर्यंत स्थनिक पोलिस प्रशासनाला या कारवाई बाबत माहिती नव्हती.
पलसाना,सुरतच्या हद्दीतील करेली गावातील कारवाई दरम्यान भिवंडी शहरातील नदी नाका येथील फरीद मंजिल या इमारतीमध्ये हा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर गुजरात एटीएस पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे.या कारवाई बाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती.त्यामुळे कारवाई बाबत दोन दिवस उलटले तरी स्थानिक पोलिसांना कारवाई व ठिकाणा बाबत काही ही माहिती नव्हती.
भिवंडी – वाडा मार्गावरील नदीनाका येथील कामवारी नदी किनारी फरीद मंजिल ही सात मजली इमारत उभी आहे.या इमारतीचे बांधकाम अपूर्ण आहे.या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर वरील एका फ्लॅट मोहम्मद युनूस आणि मोहम्मद आदिल यांनी भाड्याने घेतला होता.परंतु हे दोघे तेथे न राहता कधी कधी त्या फ्लॅट वर येत होते. या इमारतीचे मूळ जमीन मालक मुसद्दीक इस्माईल फरीद यांनी 28 जुलै रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास इमारतीच्या तळमजल्यावर उभे असताना आरोपी मोहम्मद युनूस आणि मोहम्मद आदिल या दोघांना 50 किलोच्या 5 ते 6 ड्रम मध्ये पावडर घेऊन येत असताना पाहिले.
त्यावेळी या दोघांना मुसद्दीक इस्माईल फरीद यांनी हटकले.
ही इमारत राहण्यासाठी बनवली असल्याने काय घेऊन चालला म्हणून विचारले असता या दोघांनी ड्रम मध्ये कॉस्टिक सोडा असल्याचे सांगितले.
परंतु ड्रम घेऊन या दोघां सोबत आलेले हमाल टापटीप कपडे घातलेले होते त्यामुळे फरीद यांना या दोघांवर संशय आला होता.मात्र सर्व चिडीचुप होते.मात्र गुजरात पोलिसांनी ही धडक कारवाई केल्याने सर्व प्रकार उघडकीस आला आहे.भिवंडीतील नदीनाका येथील पोलिस चौकी पासून अवघ्या 50 मिटर वर ही इमारत उभी आहे. मात्र स्थानिक पोलीसांना याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगण्यात आले.
