भिवंडीत दोन मातब्बर उमेदवारांचे अर्ज दाखल..निवडणूक कार्यालयातून एकूण ८२ अर्जाची विक्री 

भिवंडी



भिवंडी (प्रतिनिधी) : 23 भिवंडी लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीसाठी आजपर्यंत एकूण ८२ अर्जाची विक्री झाली असून आज सोमवार रोजी दोन मातब्बर उमेदवारांनी आपल्या कुटुंबासह निवडणूक कार्यालयात हजर राहून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यां कडे आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 
भिवंडी लोकसभा मतदार संघासाठी आज दुपारी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार  कपिल मोरेश्वर पाटील यांनी आपला अर्ज दाखल केला.त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा सिद्धेश पाटील व मनपाचे माजी सभागृह नेते सुमित पाटील हे उपस्थित होते.
तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( शरद पवार गट)चे उमेदवार सुरेश गोपीनाथ म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी व मुलगा सुमित उपस्थित होता.

या दोन्ही उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज भिवंडी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांच्याकडे सुपूर्द केल्याची माहिती त्यांनी दिली.    याप्रसंगी त्यांनी दिलेल्या नाम निर्देशांपैकी  कपिल पाटील यांच्या नामनिर्देशन अर्जावर भाजपचे उमेदवारी पत्र असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच आज सोमवार (दि.29)रोजी भिवंडी लोकसभा निवडणूक कार्यालयातून
अपक्ष-११, एमआयएम-०५,,बहुजन महापार्टी-०१,,धनवान भारत पार्टी-०३, बहुजन विकास आघाडी पार्टी-०२, 
भारतीय मानवता पार्टी-०२, स्वाभिमानी रिपब्लिक पार्टी-०२,
 अमन समाज पार्टी-०२, एकूण २८ नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली आहे. पहिल्या दिवशी  एकूण ५४ नामनिर्देशनपत्रे आज दुसऱ्या दिवशी २८ असे एकूण ८२ नामनिर्देशन पत्र देण्यात आली आहेत. भिवंडी मतदार संघात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *