भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला

भिवंडी


भिवंडी (प्रतिनिधी) भिवंडी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी जोरदार जनशक्ती चे शक्तिप्रदर्शन करीत आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह मिरवणुकीने वाजत गाजत निवडणूक कार्यालयात जाऊन आज दुपारी आपला अपक्ष उमेदवार म्हणून नामनिर्देशन अर्ज दाखल केला.तसेच इंडियन नॅशनल काँग्रेस तर्फे सुद्धा अर्ज दाखल केला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली आहे.त्यामुळे महाविकास आघाडीच्या गटात खळबळ माजली आहे.सुमारे 15 हजारांहून अधिक जनसमुदाय या मिरवणुकीत सहभागी झाले होते.


   भिवंडी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज सकाळपासून भिवंडी लोकसभा मतदार
संघातील बहुचर्चित उमेदवार निलेश सांबरे यांचे समर्थक तसेच जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे महिला-पुरुष कार्यकर्ते जमा झाले होते.या ठिकाणी जमा झालेल्या वाडा,शहापूर,मुरबाड.
कल्याण,टिटवाळा,
बदलापूर आणि भिवंडीतील मतदारांनी केलेल्या जयघोषात उमेदवार निलेश सांबरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार घातला.तत्पूर्वी मनपा जवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यात सुद्धा पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी उमेदवार सोबत खान्देश सेनेचे अध्यक्ष सुहास  बोन्डे, कुणबी सेनेचे शरद पाटील यांच्या सह जिजाऊ संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांना उद्देशून सांबरे यांनी आपल्या भाषणात भिवंडी लोकसभा क्षेत्राचा सर्वागीण विकास याचे महत्त्व विषद करून निवडणूक लढविण्या बाबतीत स्पष्टीकरण केले.त्यानंतर निवडणूक निर्णय कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यास
 निघाली.उमेदवार निलेश भगवान सांबरे यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले असून त्यापैकी एक अपक्ष तर दुसरा इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टीचा अर्ज दाखल निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांना सादर केल्याची माहिती निवडणूक अधिकारी जाधव यांनी दिली.

चौकट
23 भिवंडी लोकसभा मतदार अंतर्गत आज चार नामांकपत्र नामा निर्देशक पत्र दाखल 

1.) अशोक भिकू बहादरे …
( संयुक्त भारत पक्ष)

2.) निलेश भगवान सांबरे …
(अपक्ष)
3.)निलेश भगवान सांबरे … 
(इंडियन नॅशनल काँग्रेस)
4) तारा पिंट्या वाघे असे.. 
(अपक्ष)असे एकूण चार नामा निर्देशक पत्र दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *