भिवंडी (प्रतिनिधी) भिवंडी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) महाविकास आघाडीचेवतीने निवडणूक लढविणारे उमेदवार सुरेश गोपीनाथ म्हात्रे (बाळा मामा) यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांचे कडे गुरुवारी दुपारी दाखल केला.यावेळी वाजत गाजत निघालेल्या प्रचार रँलीत शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार सुरेश गोपीनाथ म्हात्रे ( बाळा मामा ) यांनी आज दुपारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.त्यानंतर
वाजत गाजत निघालेल्या रॅलीत त्यांच्या सोबत राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड,ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष दयानंद चोरघे,भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख,काँग्रेस शहर अध्यक्ष रशिद ताहीर मोमीन,शिवसेना माजी आमदार रूपेश म्हात्रे,राकाँपा शोएब खान, यांच्यासह शिवसेना,राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,महिला, व कार्यकर्ते सहभागी झाले होते.वंजारपाटी नाका ते उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे ही रँली समाप्त झाली. यावेळी सुरेश म्हात्रे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांच्या कडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

23 भिवंडी लोकसभा मतदारसंघ अंतर्गत आज एकूण दहा उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत यामध्ये
1) सुरेश जाधव ..
अपक्ष
2.)हमीद हसन सय्यद.. अपक्ष 3.)कांचन विनायक वाखारे…
न्यू राष्ट्रीय समाजवादी
4.) मनीषा संतोष गोंधळे.. अपक्ष
5.) मनोज गोवर तुरे.. अपक्ष
6.)कपिल जय हिंद पाटील… अपक्ष
7.)उमेश जयवंत चौधरी.. अपक्ष
8.)सुरेश गोपीनाथ म्हात्रे…राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
9.)सोनाली अशोक गंगावणे ..अपक्ष
10.) राहुल अशोक काठोळे…अपक्ष
अशा आहेत अशा एकूण दहा उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र आज दाखल केले तर एकूण 7 उमेदवार यांनी 9 अर्ज विकत घेतले, तर आज पर्यंत एकूण उमेदवार यांच्या अर्जांची संख्या ही 16 झाली आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली.