जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे अपक्ष उमेदवाराला वंचित आघाडीचा पाठिंबा जाहीर
भिवंडी (प्रतिनिधी) भिवंडी लोकसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्यासमोर शरदचंद्र पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचा उमेदवार जाहीर केला आहे.त्यामुळे भिवंडी व कोकण प्रांत विभागातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीचे सूर उमटत आहेत.काँग्रेस पक्षाचे कार्यकर्तेलाच उमेदवारी मिळावी यासाठी वरिष्ठ स्तरावर काँग्रेस पक्षाचे पदाधिकाऱ्याची बैठक सुरु आहे.मात्र आता उमेदवार बदल संदर्भात कोणत्याही प्रकारचा
कारवाई भूमिका जाहीर होणार नसल्याने काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. असेअसतानाच
काँग्रेसकडून उमेदवारीची अपेक्षा असलेले जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी पक्षाचेवतीने त्यांना जाहीर पाठिंबा मिळाल्याने भाजप व राष्ट्रवादी आघाडीच्या गटात खळबळ उडाली आहे.निलेश सांबरे निवडणूक रिंगणात आल्याने प्रथमदर्शनी भिवंडी लोकसभेत तिरंगी लढत होणार यावर शिक्कामोर्तब झाले.
जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून भिवंडी लोकसभा आणि पालघर लोकसभा या दोन ठिकाणी उमेदवारांची निश्चिती झाली आहे. त्यामुळे निलेश सांबरे हे
राजकीय पक्षापुढे एक आव्हान उभे केले आहे.सांबरे हे महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षातुन उमेदवारी मिळावी असे प्रयत्न होते. परंतु त्यांनी तुम्ही तुमच्या पद्धतीने लढा असे सांगितल्याने त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याची तयारी केली आहे.त्याचे प्राबल्य पाहता निलेश सांबरे यांना वंचित बहुजन आघाडीने जाहीर पाठिंबा दिला आहे।त्यामुळे जिजाऊ संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते समर्थकांमध्ये आनंद उत्सहाची लाट पसरली असुन प्रचाराची मोहीम
आखणी तात्काळ सुरू केली आहे.
गेल्या १५ वर्षात केलेल्या समाजात भरीव काम केल्याने हि निवडणूक लढवीत असल्याची माहिती निलेश सांबरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जर मी प्रशासनात गेलो तर लोकप्रतिनिधी म्हणून समाजाच्या सेवेसाठी लागणाऱ्या मोठे उपक्रम व योजना प्रत्यक्षात आणता येतील. समाजात विविध सुविधा देण्याचे काम केले म्हणून समाज माझ्या बरोबर आहे.मी निवडणुकीत बहुमताने विजयी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कर्जत-कसारा येथे एकही लोकल वाढलेली नाही. आसनगाव,वशिंद,बदलापूर येथील लोकसंख्या वाढत असताना तेथील प्रवाशांना गर्दीतून प्रवास करावा लागत आहे. ग्रामीण भागापासून शहरापर्यंत पिण्याच्या पाण्याची सोय सरकारकडून करून घेईन.सरकार कमी पडेल तेथे माझ्या प्रयत्नाने सोयी उपलब्ध करून देणार आहे.कोणाला पाडण्यासाठी निवडणूक लढवीत नाही.जिंकण्यासाठी लढत असल्याचे त्यांनी सांगितले.