भिवंडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळांना पारितोषिक वितरण समारंभ संपन्न.
भिवंडी ( प्रतिनिधी ) ज्या शहरात शांतता सुव्यवस्था असते तेथे प्रगती होत असते.त्यामुळे प्रत्येकाने धार्मिक सण व उत्सव हे एकोप्याने व एकात्मता भूमिकेतून साजरे केले पाहिजे पोलीस हे नागरिकांच्या सुरक्षतेसाठी आहेत त्यामुळे सुज्ञ नागरिकांनी पोलिसांना सहकार्य आवश्यक आहे त्यातून कायदा सुव्यवस्था चांगली राहत असते असे परखड मत ठाणे अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख यांनी भिवंडीत झालेल्या कार्यक्रमां मध्ये व्यक्त केले.

भिवंडीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती उत्सव समिती च्या माध्यमातून 2023 मध्ये संपन्न झालेल्या जयंती उत्सव प्रसंगी शिस्तबद्ध मिरवणूक व सर्वोत्कृष्ट देखावे सादर करणाऱ्या मंडळांचा गुणगौरव व पारितोषिक समारंभ कार्यक्रम बुधवार सायंकाळी भिवंडी शहरातील ओसवाल महाविद्यालय सभागृहात आयोजित करण्यात आला होता.प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे अपर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, उत्सव मंडळाचे अध्यक्ष विकास निकम,पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी,सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक देशमुख,एसीपी सचिन सांगळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ही महान व्यक्ती होती त्यामुळे जयंती उत्सव साजरा करताना आनंदात साजरा करावा मात्र यावेळी शासकीय व पोलिसांच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी सार्वजनिक मंडळांनी घ्यावी.डी.जे. वाजवण्यास परवानगी नाही रात्री 12 वाजेपर्यंतच वाद्य वाजवता येतील अशी माहिती.यावेळी अपर पोलीस आयुक्त देशमुख यांनी दिली आवाजाचे डेसिबलची मर्यादा पाळा अन्यथा वाढला तर तो गुन्हा ठरतो,आवाजामुळे आरोग्यावर परिणाम होत असतो त्यामुळे काळजी घ्यावी असे आवाहन देशमुख यांनी केले.यावेळी सिद्धार्थ मित्र मंडळ खोणी गांव (प्रथम) सम्राट मित्र मंडळ वराळ देवी नगर कामतघर (विशेष उल्लेखनीय)
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ (महात्मा फुले नगर १) समता सामाजिक संस्था (राहुल नगर कामतघर) (द्वितीय) डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ (नवजीवन कॉलनी पद्मानगर) व रत्नदीप मित्र मंडळ (आनंदनगर अंजुर फाटा)(तृतीय) तर उत्तेजनार्थ पारितोषिक सेव्हन स्टार डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ,(संगमपाडा) सिद्धार्थ नगर मित्र मंडळ (कोंनगाव), बौद्धजन पंचायत समिती उत्सव मंडळ. (गायत्री नगर) भैय्यासाहेब आंबेडकर नगर जयंती उत्सव मंडळ (पटेल कंपाऊंड धामणकर नाका) श्रमिक नगर मित्र मंडळ (मानसरोवर रोड) डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ (मिलिंद नगर) धम्म चक्र मित्र मंडळ(संघमित्रनगर)डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ (साई प्रसन्न सोसायटी नारपोल) भीमसैनिक उत्सव मंडळ (भाग्यनगर कामतघर) सम्राट मित्र मंडळ (विठ्ठल नगर रतन टॉकीज मागे भिवंडी) भिमसेना मित्र मंडळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ (खारबाव पंचशील नगर) या सार्वजनिक उत्सव मंडळांना सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.तसेच उत्सव मंडळाच्या देखाव्याचे निरीक्षण करणाऱ्या समिती सदस्यांचाही पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांनी केले तर सूत्रसंचालन शैलेश मांजरेकर व आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांनी केले यावेळी उत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.