दिड लाखांचे 13 मोबाईल हस्तगत
भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर परिसरात मोबाईल चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांना मध्ये तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला जात आहे.असे असतानाच कल्याण रोड परिसरातील एका हॉटेलमध्ये टेबलावर राहिलेला मोबाईल चोरी केल्याची खळबळजनक घटना हॉटेलमधील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश घुगे यांच्या नेतृत्वाखालील पथक करीत असताना सीसीटिव्ही च्या माध्यमातून रिझवान उर्फ रिज्जो नबी इनामदार या संशयित मोबाईल चोरट्यास नवीबस्ती परिसरातून अटक केली.त्याच्या कडे कडून तपास केला असता.
हॉटेल मधील मोबाईल चोरी सह वर्तक नगर पोलिस ठाणे हद्दीत 2022 मध्ये केलेल्या घरफोडीतील 12 मोबाईल सुध्दा हस्तगत केले असून आरोपी कडून एकूण एक लाख 45 हजार रुपये किमतीचे 13 मोबाईल जप्त करण्यात यश मिळवले आहे.विशेष म्हणजे अटक केलेला गुन्हेगार रिझवान उर्फ रिज्जो नबी इनामदार यावर चोरी, जबरी चोरी अशा पद्धतीचे भिवंडी,ठाणे,कल्याण व मुंबई या परिसरात एकूण 21 गुन्ह्याची नोंद आहेत अशी माहिती पोलिस निरीक्षक ( गुन्हे ) अतुल अडुरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
