प्रतिमेची वाजतगाजत भिवंडीत भव्य शोभायात्रा
केंद्रीय मंत्री झाले सहभागी.
भिवंडी ( प्रतिनिधी ) समस्त जैन समाजाचे आराध्य दैवत श्री.भगवान महावीर स्वामी यांचा जन्मोकल्याणक महोत्सव भिवंडी शहर परिसरातील जैन मंदिरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यानिमित्ताने आज सकाळी वाजत गाजत भगवान महावीर स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन करून भव्य रथयात्रा काढण्यात आली होती. निघालेल्या या रथयात्रेत पारंपरिक पद्धतीने वेषभूषा करून सुमारे 20 हजारांहून अधिक महिला व नागरिक सहभागी झाले होते.

गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचे सावट असल्याने धार्मिक उपक्रम व मिरवणूक कार्यक्रम होत नव्हते आता राज्य शासनाने धार्मिक कार्यक्रम व मिरवणूक काढण्यास परवानगी दिल्यामुळे धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न होत आहेत.

श्री.भगवान महावीर उत्सवा निमित्त जैन महासंघाच्यावतीने धार्मिक उपक्रम, महाप्रसाद कार्यक्रम करण्यात आले.ठाणे रोडवरील शंखेश्वर जैन मंदिरात श्री.भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन करून वाजत गाजत रथयात्रा काढण्यात आली होती.या मिरवणुकीत मतदान करण्याचा देखावा उभा करून आवाहन करण्यात आले.केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार महेश चौगुले,मनपाचे माजी सभागृह नेते सुमीत पाटील,संतोष शेट्टी,समस्त जैन महासंघाचे प्रमुख मीठालाल जैन,जेष्ठ समाज नेते देवराज राका,अशोक जैन,
पारसभाई मेहता,
प्रदिप राका, जयंतीलाल भंडारी, पप्पू जैन यांच्या सह मान्यवर जैन बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते निघालेली रथयात्रा धामणकर नाका,
गौरीपाडा प्रभूआळी मंडई,नवीचाळ, बाजारपेठ,ठाणगे आळी रोड,कासार आळी,छत्रपती शिवाजी चौक मार्गे ही रथयात्रा दुपारी गोकुळ नगर येथील प्रगती मैदान येथे संपन्न झाली.यावेळी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा लाभ शेकडो महिला व नागरिकांनी घेतला.जायंट्स भिवंडी युथ आणि जायंट्स मेट्रो सहेली यांच्यावतीने मिरवणुकीतील नागरिकांना पाणी वाटप करण्यात आले.