भिवंडीतील उमेदवारांचा शहरी-ग्रामीण भागातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न
भिवंडी (शरद भसाळे) केंद्रीय निवडणूक आयोगाने भर उन्हाळ्यात निवडणूक जाहीर केल्या आहेत.त्यामुळे उमेदवारांसह राजकीय कार्यकर्त्यांनी देखील प्रचार निवडणुकीचे वातावरण गरम करण्यास घेतले आहे.भिवंडी लोकसभा मतदार संघात दोन वेळा निवडून आलेल्या भाजपा उमेदवार केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या समोर सामना करण्यासाठी अपक्ष व महाविकास आघाडीचा उमेदवार शड्डू ठोकून उभे राहिले आहेत.असे
असताना अजून दोन राजकीय पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात येणार असल्याची माहिती मिळत आहे.त्यामुळे लवकरच हि निवडणूक रंजक होणार असल्याचे चित्र स्पष्ट होणार आहे.दरम्यान महाआघाडी आणि महायुतीमधील घटक पक्ष एकत्रित प्रचार करताना दिसत नसल्याने नागरिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
भिवंडी पूर्वमध्ये तीन लाख १७ हजार ३४६ मतदार, भिवंडी पश्चिममध्ये दोन लाख ९२ हजार १०७ आणि १३४ मतदार, भिवंडी ग्रामीण विधानसभेत तीन लाख १५ हजार १५५ मतदार आणि शहापूर, कल्याण पश्चिममध्ये दोन लाख ७४ हजार २७० मतदार आहेत. मुरबाड विधानसभा मतदारसंघात चार लाख ३१ हजार ६०९ मतदार आहेत. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदार आहेत. २०१४-२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकी
नंतर सुमारे एक लाख ११ हजार नवीन मतदार मतदार यादीत सामील होत आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे कपिल पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार)चे सुरेश(बाळा) म्हात्रे आणि जिजाऊ संस्थेचे प्रमुख निलेश सांबरे हे उमेदवार सध्या मैदानात आहेत.निलेश सांबरे यांना बहुजन वंचित विकास आघाडीने पाठिंबा दिल्याने या निवडणुकीला वेगळा रंग चढला आहे. या निवडणुकीत बहुजन समाज पार्टी आणि एमआयएम आपले उमेदवार उभे करणार आहेत.त्यामुळे केवळ भिवंडी तालुक्यातील तीन मतदार संघात मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन होणार आहे. त्यामुळे मतदारांची मोट बांधण्यात सर्व उमेदवार उन्हाची पर्वा न करता मेहनत घेत असल्याने सध्या उन्हाबरोबर निवडणुकीचे वातावरण देखील गरम होऊ लागले आहे. २० मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत नशीब आजमावणारे तिन्ही राजकीय पक्षांचे उमेदवार कडाक्याच्या उन्हात मतदारांशी संपर्क साधून भरघोस मतांनी विजयी व्हावेत अशी विनंती मतदारांना करत आहेत.मात्र प्रचारात महाआघाडी आणि महायुतीमधील घटक पक्ष एकत्रित प्रचार करताना दिसत नसल्याने गटबाजी असल्याचे चित्र दिसत आहे.विशेष म्हणजे भिवंडी लोकसभेची मतदार संख्या २० लाख ८ हजार १६६ इतकी आहे. २३ एप्रिलपर्यंत नवीन नावांची भर पडल्याने मतदारांची संख्या वाढणार हे निश्चित आहे.भिवंडी लोकसभा मतदारसंघांतर्गत ६ विधानसभांमध्ये एकूण पुरुष मतदार १० लाख ८९ हजार ३११ तर महिला मतदार ९ लाख १८ हजार ५१८आहेत. लोकसभा मतदारसंघातील ३३७ मतदार तृतीयपंथी आहेत.
चौकट
भिवंडी लोकसभा २०१४ मध्ये भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांनी काँग्रेसचे उमेदवार विश्वनाथ पाटील यांचा सुमारे एक लाख १० हजार मतांनी पराभव केला
आणि २०१९ च्या निवडणुकीत
पाटील हे पुन्हा भाजपचे उमेदवार म्हणून काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांचा सुमारे १ लाख ५७ हजार मतांनी पराभव केला होता. या दोन्ही वेळेचा निकाल पाहता सर्व उमेदवारांचा मतदान जास्त कसे होईल यावर सर्वाचा भर आहे.