जय हनुमान जयघोष करत भाविकांनी भिवंडीत काढल्या मिरवणूका..

भिवंडी

भिवंडी ( भानुदास भसाळे ) भिवडी ग्रामीण व शहरात हनुमान जयंती उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.या वेळी शक्ती देव असलेल्या हनुमाना चे प्रतिमा फुलांनी सजविलेल्या रथा मध्ये ठेऊन भाविकांनी वाजत गाजत भव्य मिरवणूका काढल्या होत्या.या मिरवणुकीत हनुमान चा जयघोष करीत भाजप,शिवसेना,मनसे व बजरंग दलाचे पदाधिकारी व कार्यकत्याँसह नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.तसेच मंदिरात दर्शन घेण्यासाठी महिला सह भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती.त्यामुळे विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.


    श्री.महाबली हनुमान जयंती उत्सव निमित्त कोंबडपाडा, ताडाळी,कासार आळी,वेताळपाडा, प्रभुआळी,खोणी गांव,कारिवली,पुर्णा,काटई,कांबे,राहनाळ,कोनगाव,शेलार,
कचेरीपाडा,कल्याण रोड-नवीवस्ती,हफसन आळी,ठाणगे आळी, पद्मानगर,धामणकर नाका,कणेरीअशा विविध भागातील मंदिरात विद्युत रोषनाई करून मंदीरात फुलांची सजावट करण्यात आली होती.तसेच भजन कीर्तन महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते.

भाविकांची मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.धामणकर व कल्याणरोड नवीवस्ती येथुन श्री.हनुमानची प्रतिमा रथा मध्ये ठेऊन वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.केंद्रीय मंत्री कपिल पाटील,आमदार महेश चौघुले,माजी आमदार रूपेश म्हात्रे,सभागृह नेते सुमित पाटील,सिद्धेश्वर कामुर्ती यांच्या सहविविध पक्षांचे पदाधिकारी नागरीकांनी मंदिरात हनुमानाचे जाऊन दर्शन घेतले.सहभागी झाले होते.
भिवंडी शहरातील व-हाळ देवी मंदिरा लगत श्री.हनुमानसेवा ट्रस्ट द्वारा उभारण्यात आलेल्या 54 फूट उंच श्री.भक्तांजनेय स्वामी हनुमान मुर्तीचेे पुुजन दर्शन करणयासाठी भाविकानी सकाळ पासुन मोठी गर्दी केली होती.महाराष्ट्रातील 54 फुट उंचीची ही दुसरी मुर्ती आहे.या ठिकाणी धार्मिक  भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *