भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर मुदतबाह्य विविध प्रकारचे नामांकित खाद्यपदार्थ विक्री होत असून त्यामुळे मानवाच्या आरोग्यास बाधा पोहचत आहे.याबाबत
अन्न व औषध प्रशासन सुरक्षा विभागाकडे आलेल्या तक्रारीवरून त्यांनी भिवंडी शहरातील खाडीपार खोणी परिसरात मुदतबाह्य खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या विरोधात कारवाई करीत पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे. निलेश पटेल,मिसबाउल फेजुल हक व सोनू यांनी एकता चौक,खाडीपार खोणी येथे चेडार चिज, डेरीमिल्क कॅडबरी चॉकलेट, खाण्याचे सॉसेस,बिस्कीटे, विनेगर असे परकीय भाषेत मजकूर लिहलेले अन्न पदार्थ खाण्यास अयोग्य व मानवी शरीरास अपायकारक असल्याचे माहीती असुन ही विक्रीकरीता ठेवले होते तर खाद्यपदार्थाच्या आवरणा वरील मुळ लेबल मध्ये छेडछाड करून ठेवल्याचे तपासणीत आढळून आल्याने ठाणे येथील अन्न सुरक्षा अधिकारी अरूणा जगन्नाथ वीरकायदे यांनी दिलेल्या तक्रारी वरून निजामपूरा पोलिस ठाण्यात फसवणुकी सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी या ठिकाणी मिसबाउल फैजुल हक यास अटक केली आहे.पुढील तपास वपोनि संतोष आव्हाड यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.डी.मारणे करीत आहेत.
