केंद्रध्यक्ष मतदान पेटया  घेऊन पोलीस बंदोबस्तात केंद्रावर रवाना

भिवंडी


भिवंडी निवडणूक निर्णय अधिकारी, 
ठाणे सहपोलीस आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांनी मतदारसंघाचा घेतला आढावा…

भिवंडी   ( शरद भसाळे ) भिवंडी लोकसभा मतदार संघात  सोमवार 20 मे 2924  रोजी मतदान होणार आहे.त्यामुळे निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.
आज रविवार सकाळी भिवंडी निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी सह निवडणूक निर्णय अधिकारी उदय किसवे,सह निवडणूक निर्णय अधिकारी विकास गजरे यांच्याशी संपर्क करून केंद्राध्यक्षा सह अधिकारी वर्गास निवडणूक मतदान कामा संदर्भात सुचना देत  मतपेटया त्यांच्या सुपुर्द केल्या, सदर मतदान पेटया घेऊन ते पोलीस बंदोबस्त घेऊन मतदान केंद्रावर बस मधून रवाना झाले आहेत.तर ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त डॉ ज्ञानेश्वर चव्हाण व ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. स्वामी यांनी मतदारसंघात संघात विशेष गस्त घालून मतदान केंद्राची पाहणी केली. आणि भिवंडी पोलीस उपाआयुक्त व सहाय्यक पोलीस आयुक्त व सर्व पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधून सतर्क राहण्याचे सुचना दिल्या, मतदान केंद्र परिसरात सुरक्षितता दृष्टिकोनातून विशेष पोलीस बंदोबस्त ठेवून सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याची माहिती ठाणे सह पोलीस आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली.अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा सहपोलीस आयुक्त डॉ.चव्हाण यांनी दिला आहे.


       भिवंडी लोकसभा मतदार संघात एकूण 2191 मतदान केंद्र असुन या मतदारसंघात कायदा सुव्यवस्था व शांततापूर्ण निर्भय वातावरणात निवडणूक मतदान व्हावे यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंनगारे व ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे,
सहपोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी आज रविवार सकाळी कामकाजाचा आढावा घेतला. 23 भिवंडी लोकसभा मतदार संघात एकूण सहा विधानसभा मतदार संघ येत असून यामध्ये सहाही मतदार संघात एकूण 20 लाख 87हजार ,244  मतदार आहेत यात पुरूष मतदार 11लाख 29 हजार ,714 तर महिला मतदार 9 लाख ,57 हजार,191 तर तृतीय पंथीय 339 असे एकूण 20 लाख 87 हजार ,244 मतदार संख्या आहे.भिवंडी पुर्व,भिवंडी पश्चिम, भिवंडी ग्रामीण, शहापूर, कल्याण (प) व मुरबाड अशा 6 विधानसभा मतदार संघात एकूण 2 हजार 191 मतदान  केंद्र आहेत.यामध्ये 134 भिवंडी ग्रामीण मध्ये मूळ  344 मतदान केंद्र व एक वाढीव 1 असे  एकूण 345 मतदान केंद्र आहे.  135 शहापूर मध्ये 326 मतदार  केंद्र,  136 भिवंडी (पश्चिम) मध्ये मूळ 293 अधिक वाढीव 4 असे एकूण 297 मतदान केंद्र, 137 भिवंडी पुर्व विधानसभा मतदार संघात केंद्र मूळ मतदान केंद्र 304 अधिक 10 असे एकूण 314 मतदान केंद्र, 138 कल्याण (पश्चिम)  मतदार संघात एकूण मूळ मतदान  केंद्र 397 अधिक एक असे 398 तर 139 मुरबाड मतदार संघात 511 मतदान केंद्र आहेत.या सहा विधानसभा मतदार संघात एकूण मूळ मतदान केंद्र 2 हजार 175 अधिकची 14 अशी एकूण 2191 मतदान केंद्र आहेत. निवडणूकीत एकूण 27 उमेदवार उभे असल्यामुळे एकूण 2 बी.यू  लक्षात घेता एकूण 878 युनिट लागणार आहेत.या सर्वांकरीता एकूण 2191 ईव्हीएम लागणार आहेत. 20 टक्के अधिक मशीन  तयार करून ठेवण्यात आले आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली. बी.यू 20 टक्के प्रमाणे 439 सी.यू. व्हीव्हीपँट मशीन  लागणार आहेत.या सर्व मतदानात केंद्रांवर मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी एक, दोन व तीन,शिपाई यांची  नेमणूक करण्यात आलेले आहेत.एकूण मतदान केंद्राध्यक्ष 2 हजार 191 राखीव 220, मतदान अधिकारी नंबर 1 करीता एकूण  2 हजार 191 व राखीव मतदान अधिकारी 220, मतदान अधिकारी नंबर 2 व 3, शिपाई कर्मचारी 6 हजार 573 व राखीव कर्मचारी 660 व प्रत्येक केंद्रावर पोलीस कर्मचारी 2191 या प्रमाणे मनुष्यबळ आहे. त्याच बरोबर भिवंडी ग्रामीण मध्ये  345 मदान केंद्र करीता 46 क्षेत्रीय व 46 सहायक क्षेत्रीय अधिकारी, 135 शहापूर मध्ये 326 मतदान केंद्र असून 48 क्षेत्रीय अधिकारी, 48 सहायक क्षेत्रीय अधिकारी, 136 भिवंडी (पश्चिम)मध्ये  297 मतदान केंद्र असून त्यात 29 क्षेत्रीय तर 29 सहायक क्षेत्रीय अधिकारी, 137 भिवंडी (पूर्व) मध्ये 314 मतदान केंद्र असून त्यात 30 क्षेत्रीय अधिकारी व 30 सहायक क्षेत्रीय अधिकारी, 138 कल्याण (पश्चिम)मध्ये 398 मतदान केंद्र असून 42 क्षेत्रीय तर 42 सहायक क्षेत्रीय अधिकारी,  तर मुरबाड मतदार संघ येथे  511 मतदान केंद्र असून 72 क्षेत्रीय व 72 सहायक क्षेत्रीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. सर्व नियुक्त कर्मचारी यांना निवडणुकीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे सर्व सहा विधानसभा मतदार संघात एकूण 263 झोनमध्ये  यामध्ये 241 बसेस, मिनी बस 149, मोठे  ट्रक 22, टेम्पो 12, जीप 472, कार 11 अशा एकूण 936 वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदाराची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याकडे देखील लक्ष देण्यात येत आहे. मतदान केंद्रावर पुरेशा पिण्याच्या पाण्याची सोय, व्हील चेअर, पाळणाघर, सावली करिता मंडप, प्रथमोपचार सोयी,  आशा वर्कर यांच्या देखील नेमणुका करण्यात आल्या असल्याची माहिती त्यांनी दिली.


चौकट
भिवंडी ग्रामिण मतदार संघामधील सारंग या गावातील मतदान केंद्र क्र.३२१ हे विशेष (युनिक) मतदान केंद्र असणार आहे. हे मतदान केंद्र ठाणे जिल्ह्यातील आगरी-कोळी संस्कृतीने सजविण्यात येणार आहे. यासाठी मासे पकडण्यासाठी वापरण्यात येणारी जाळी, मासे विक्रीसाठी वापरण्यात येणा-या टोपल्या, बोट, रांगोळी साकारण्यात येणार आहे. तसेच मतदान केंद्रावरील कर्मचारी हे पारंपारीक कोळी वेशभुषेत असतील अशी देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *