विमानाने प्रवास करून घरफोडी करणाऱ्या चोराकडून भिवंडी पोलिसांनी केले ६२ लाखाचे दागिने जप्त

भिवंडी


भिवंडी (प्रतिनिधी) घरफोडी करून मोबाईल न वापरता विमानाने प्रवास करणाऱ्या करणाऱ्या अट्टल चोरट्यास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने पोलीस उपाआयुक्त शिवराज पाटील यांच्या भिवंडी शाखेच्या पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने तपास करीत आसाममधून अटक केली. आहे.या
प्रकरणी गुन्हा दाखल करून सखोल चौकशी केली असता सदर चोराने ठाणे जिल्ह्यासह नवीमुंबई आणि मुंबईत गुन्हे केल्याचे उघड झाले असुन पोलीसांनी त्याच्या कडून सुमारे ६२ लाख २४ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
  भिवंडी  शहरातील 
नारपोली पोलीस स्टेशन अंतर्गत झालेल्या घरफोडीतील गुन्हेगार मोईनुल अब्दुल मलीक इस्लाम (रा. सामरोली गांव,आसाम)यांच्याबाबत गुन्हे अन्वेषण विभागास माहिती प्राप्त झाली.तो नवी मुंबई येथे राहण्यास होता.त्याचेविरूद्ध नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात चोरीचे गुन्हे दाखल आहेत.परंतु सद्या तो फक्त चोरी करण्याकरीता विमानाने प्रवास करून मुंबई येथे येतो व चोरी केल्यानंतर पुन्हा विमानाने प्रवास करून आसाम व नागालॅड या राज्यात लपण्यासाठी पळून जावुन विविध ठिकाणी वास्तव्य करीत होता. त्यांचा राहण्याचा कोणताही ठोस पत्ता नव्हता तसेच मोबाईल फोन देखील वापरत नव्हता. त्याचप्रमाणे तो त्याची ओळख लपविण्या करीता विग घालत होता. रमजान महिना सुरू असल्याने तो आसाम राज्यातील मुळ गांवी आला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार यांना प्राप्त झाली.त्यामुळे त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली. त्यामुळे गुन्हे शाखेचे पोलीस उपाआयुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी घरफोडी चोरीचा गुन्हे उघडकीस आणण्याकरीता 
सपोनि धनराज केदार, पोहवा अमोल देसाई, भावेश घरत यांचे पथक नेमले त्यांनी आरोपीच्या मुळ गांवतील परिसरात सलग ०५ दिवस वेषांतर करून मोटर सायकलवर फिरून आरोपीबाबत माहिती प्राप्त करून त्यास आसाम मधील मुराजर पोलीस स्टेशनच्या मदतीने ताब्यात घेतले.हा आरोपी हा अटक टाळण्याचे हेतुने त्याने राहत्या घराच्या खिडकीतुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्याच्या  पायास दुखापत झाली. त्या दुखापतीचा फायदा घेवुन तो तपासामध्ये सहकार्य करीत नव्हता. तेंव्हा पोलिसांनी कौशल्याने तपास करून त्याचा ठाणे, कल्याण, डोंबिवली, मुंबई व नवी मुंबई शहरातील एकुण २२ गुन्हयातील सहभाग निष्पन्न केला असुन नमुद गुन्हयात चोरीस गेलेला एकुण ६२, २४,०००/- रू. किमतीचे ८८९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने हस्तगत करण्यात आलेले आहे.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *