भिवंडी ( शरद भसाळे ) भिवंडी शहर परिसरात मोबाईल चोरी,सोन्याचे दागिने
व घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या विशेष पोलीस पथकाने मिळालेल्या माहितीवरून तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास करीत सराईत गुन्हेगार असलेल्या
पाच आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली आहे.
त्यांच्याकडून दोन दुचाकी स्कुटर,सात मोबाईल फोन,
सोन्याचे दागिने,व इतर चोरी केलेला किमंती ऐवज असा सुमारे तीन लाख १२ हजार ४२३ रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करून ९ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
जुनेद अहमद मोहम्मद हनीफ शहा, (वय २०,रा.गायत्री
नगर,भिवंडी)
मोहम्मद आकीब मकबुल खान (वय.२२ रा.गायत्रीनगर, भिवंडी) हमजा सुजूद अहमद सिध्दीकी (वय २० रा.गायत्री नगर,भिवंडी.) शाहरूख इमरान अन्सारी (वय २२ रा.शांतीनगर,
भिवंडी.) शाकीर साजिद शेख (वय २२ रा.न्यु गौतम नगर,
भिमवाडी रोड, गोवंडी, मुंबई)अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नांवे आहेत.भिवंडी शहरातील विविध भागात गेल्या काही महिन्यापासून घरफोडी व मोबाईल फोन,दागिने चोरीचे गुन्हे घडत असुन पोलीस ठाण्यात याबाबत तक्रारी दाखल होत आहेत.त्यामुळे भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि श्रीराज माळी, मिथुन भोईर, पोउनि रविंद्र पाटील,रामचंद्र जाधव,पोहवा प्रशांत राणे,निलेश बोरसे,
सुदेश घाग,सपोउनि सुनिल साळुंके,
सुधाकर चौधरी,
साबीर शेख,रंगनाथ पाटील,किशोर थोरात, राजेश गावडे,प्रकाश पाटील,शशिकांत यादव,वसंत चौरे,अमोल इंगळे,
भावेश घरत,विजय कुंभार,सर्फराज तडवी,महिला पोहवा माया डोंगरे या पोलीस पथकाने मिळालेल्या तांत्रिक विश्लेषणाचे आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेत पाच सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कौशल्यपुर्ण चौकशी तपास करून तीन लाख १२ हजार ४२३ किमतीचे ०२ दुचाकी स्कुटर, ७ मोबाईल
फोन, ४ वायरचे बंडल,सोन्याचे दागिने व रोख रूपये असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यांच्याकडून भिवंडी शहरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेले ९ गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती पोलिसांनी दिली.अधिक तपास गुन्हे शाखेचे पोलीस करीत आहेत.

