भिवंडी ( बी.एस. ) बृहन्मुंबई महानगर पालिका व भिवंडी महापालिकेस पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख तलाव – धरण जलाशयाची पातळी कमी झाली आहे.त्यामुळे पाणी पुरवठयात घट झाली आहे. त्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्यामुळे भिवंडी महापालिका कार्यक्षेत्रात दि.५ जुन २०२४ पासुन १० % टक्के लागु करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगर पालिका प्रशासनाकडुन घेण्यात आला आहे. याबाबत भिवंडी पालिका प्रशासनाला कळविण्यात आले आहे.त्यामुळे आता शहर परिसरातील रहिवाशांना तीव्र पाणी टंचाई चा सामना करावा लागणार आहे.
पाणी पुरवठा विभाग भिवंडी यांच्या कडून पालिका कार्यक्षेत्रातील नागरीकांना कळविण्यात आले आहे कि बृहन्मुंबई महानगर पालीकेच्या प्रमुख जलाशयां
मधील पाणी पुरवठया घट झाली आहे, त्यामुळे पाणी साठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणुन
दि.५ जुन २०२४ पासुन १०% टक्के लागु करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाकडुन
घेण्यात आला आहे.
त्यामुळे भिवंडी शहरात ज्या भागात मुंबई महानगर पालीकेकडुन पाणी पुरवठा होतो त्याभागात बुधवार दि.०५जून २०२४ रोजी पासुन कमी प्रमाणात व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती भिवंडी पालिका पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. शहरातील मानसरोवर भंडारी कंम्पाऊंड, देवूनगर, हाफिजनगर, हांडी कंम्पाऊंड, आजमीनगर, न्यु टावरे कंम्पाऊंड, लकडा वाली चाळ, अशोक नगर,नारपोली, धामनकर नाका रोड, पद्मनगर, सोनारपाडा, पटेल कंम्पाऊंड, माधवनगर,सोमानगर,भैयासाहेब आंबेडकर नगर, न्यु प्रकाश नगर, अजंठा कंम्पाऊंड, कणेरी, तेलीपाडा,पायल टॉकीज, मुर्तजा कंम्पाऊंड, गौरीपाडा, समदनगर, जैतुनपुरा, कारीवली रोड, हमालवाडा,
बंदर मोहल्ला,तांडेल मोहल्ला,मंगल बाजार स्लॅब खजुरपुरा,
भोईवाडा, नाचन कंम्पाऊंड, दर्गारोड, कारीवली रोड, फक्की कंम्पाऊंड, तकिया आमानिशा, रोशनबाग, ईदगाह झोपडपट्टी, सौदागर मोहल्ला, भुसार कंम्पाऊंड,वाजा मोहल्ला, धोबीआळी, वाणीआळी, ब्राम्हण आळी,कासार आळी,
भिवंडी टॉकीज परिसर, ठाणगे आळी, अंबींकानगर, नजराना कंम्पाऊंड, शिवाजी नगर,नवी चाळ,
बाजारपेठ,मंडई, कुंभारवाडा, हाफसन आळी, तीनबत्ती आणि निजामपुरा अदि परिसरात कमी प्रमाणात व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे
त्यामुळे पाणी कपातीच्या काळावधीत पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा तसेच काटकसरीने पाणी वापरुन महानगर पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिका प्रशासनाचेवतीने करण्यात आले आहे.
