भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात प्रचाराच्या अंतिम टप्प्यात भाजप,
काँग्रेस,समाजवादी पक्ष व अपक्ष उमेदवारां मध्ये प्रचार सभा व पदयात्रा काढून मतदार संघातील मतदारांशी संवाद साधत आहेत. त्यामुळे या मतदार संघात प्रचाराची रणधुमाळी जोमात सुरू झाली असून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत असे असतानाच आज रविवार दुपारी अचानकपणे एमआय एमपक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणारे समाजवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार रियाज आझमी यांना जाहीर पाठिंबा दिल्याची घोषणा एमआयएम पक्षाचे भिवंडी सरचिटणीस अमोल कांबळे,शेरु शेख यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली त्यामुळे राजकीय वर्तुळात खबर माजली आहे,

भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून एमआयएमपक्षाचे अधिकृत उमेदवार वारिस पठाण हे निवडणुकीच्या रिंगणात आहे असे असताना अचानकपणे एमआयएम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे पठाण अडचणीत आले आहेत,आता या मतदारसंघात अत्यंत अटीतटीची व चुरशीची निवडणूक होणार असल्याचे चिन्हे दिसत आहे.
भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष खालीद गुड्डू शेख यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती मात्र पक्षाने त्यांना उमेदवारी न देता मुंबई येथील पक्षाचे माजी आमदार वारिस पठाण यांना उमेदवारी दिली त्यामुळे एमआयएम पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तीव्र नाराज झाले होते, गेल्या विधानसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाचे खालीद गुड्डू शेख यांनी 44 हजार मतं घेऊन दुसऱ्या क्रमांकावर होते, त्यामुळे एमआयएम पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते खालिद गुड्डू शेख यांना उमेदवारी द्या अशी मागणी करत होते मात्र पक्षाने त्यांच्या मागणीकडे लक्ष न दिल्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्ते तीव्र नाराज होते उमेदवार वारिस पठाण हे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता
प्रचार काम करीत असल्याने पदाधिकारी व कार्यकर्ते तीव्र नाराज
होते,अखेर आज एमआयएम पक्षाचे सरचिटणीस अमोल कांबळे,शेरूभाई शेख यांनी समाजवादी पक्षाचे उमेदवार रियाज आजमी यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन समाजवादी पक्षाचे उमेदवार रियाज आझमी यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले, त्यामुळे आता या मतदारसंघात भाजप, समाजवादी पक्ष, काँग्रेस व अपक्ष अशा विविध पक्षाच्या उमेदवारां मध्ये चुरशीची लढत होणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.