भिवंडी ( बी.एस. ) ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात असलेल्या एकमेव संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी नामदेव शिंपी समाजाचेवतीने कल्याण येथे भव्य राज्यस्तरीय वधू व वर पालक मेळावा संमेलन आयोजित करण्यात आला आहे त्यामुळे समाज बांधवांनी या संमेलन कार्यक्रम मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ठाणे जिल्हा नामदेव शिंपी उन्नती मंडळ व भिवंडी नामदेव शिंपी समाज यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नामदेव शिंपी समाज बांधवाची उन्नती प्रगतीसाठी व नामदेव महाराज यांच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी हा स्तुत्य उपक्रम कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.कल्याण येथील आचार्य अत्रे नाट्यगृह सुभाष मैदान जवळील मराठा मंदिर हॉल मध्ये रविवार 24 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे.नामदेव, अहीर,भावसार,वैष्णव या समस्त शिंपी समाज बांधवांनी
राज्यस्तरीय होणाऱ्या वधू व वर पालक मेळाव्या उपवर वधू आणि वर पालकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ठाणे जिल्हा नामदेव शिंपी उन्नती मंडळ, भिवंडी व संलग्न नामदेव शिंपी समाज मंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.अधिक माहिती माहिती साठी
१):चंद्रकांत सारंगधर
९७०२१२६४२१ २) रविंद्र कालेकर ९९६७५८५८१६ ३)महेंद्र माडकर
९०९६७६९८८८ ४) भानुदास भसाळे ७७२००३११३१ या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
