भिवंडी ( भानुदास भसाळे )मुबंईत 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेले पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना भिवंडी पोलीस उपाआयुक्त व शांतता समिती सदस्य, नागरीकांनी रक्तदान व पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम भिवंडी पोलीस उपाआयुक्त कार्यालयाचा प्रांगणात आज सकाळी संपन्न झाला.या वेळी पोलीस अधिकाऱ्यासह महिला व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच या वेळी संविधान दिना निमित्त पोलीस उपाआयुक्तांनी सविधान वाचन करून शपथ ग्रहण करण्यात आली.
मुंबई 26/11 या दहशतवादी हल्यात शहिद
झालेल्या पोलीस जवानांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम भिवंडी पोलीस नियंत्रण कक्षाच्या प्रागंणात आज सकाळी 11 वा. आयोजित करण्यात आला होता.


पोलीस उपाआयुक्त मोहन दहीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात वरिष्ठ पोलीस निरीक्षक व कर्मचारी सह विविध मान्यवर नागरिक उपस्थित होते, यावेळी पोलीस उपाआयुक्तांचे हस्ते शहिद ज्योत प्रज्वलित करून दहशदवादी हल्ल्यात शाहिद झालेले हेमंत करकरे,अशोक कामटे,विजय साळसकर,संदीप उन्नीकृष्णन यांच्यासह शहिद पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा प्रतिमेस पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी संविधान दिना निमित्त पोलीस उपाआयुक्त दहीकर यांनी संविधान वाचून शपथ ग्रहण केली.पोलीस संकुलामध्ये शांतता समिती व पोलीस दलाचे सयुक्त विद्यमाने रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.या वेळी पोलीस अधिकारी,कर्मचारी व नागरिकांनी रक्तदान केले.प्रसंगी शांतता समीती सदस्य सलाउद्दीन शेख गोपालसिंग ठाकूर जेष्ठ पत्रकार शरद भसाळे,वसीम खान,अयाज मोमीन, मधुकर गायकवाड,
मुशताक मोमीन, एजाज खान,वैशाली मिस्त्री, रुकसाना कुरेशी,अँड. नियाज मोमीन,लतीफ बाबा,सुमित्र काबळे,जगदीश पाठारे, यांच्या सह नागरिक,महिला वर्ग,पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.