भिवंडी ( भानुदास भसाळे ) भिवंडी शहर परिसरात असलेल्या गणपती मंदिरात आज शनिवार दुपारी गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात संपन्न झाला.यावेळी महिलांनी फुलांनी सजवलेल्या पाळण्यात बाल गणेश मुर्ती ठेऊन गायण करीत गजाननाचा जयघोष केला यावेळी उपस्थित महिलांसह नागरीकांनी गणपती मूर्ती वर पुष्पवुष्टी केली.यावेळी उत्साही भक्तांनी मंदिरा समोर जोरदार फटाक्यांची आतिषबाजी केली.
गणेश जयंती निमित्त आज भाविकांनी वाजत गाजत मिरवणूक काढून घरा मध्ये गणेश मूर्ती ची स्थापन केली. तर भिवंडी टाँकीज येथील गणपती मंदिर,कोंबडपाडा येथील विनायक मंदिरास विविध प्रकारचे आकर्षक फुलांचे माळा व विद्युत रोषणाईनेकरून सजावट करण्यात आली होती.

त्यामुळे दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती तसेच ब्राम्हण आळी गणपती मंदिर,कामतघर गणेश मंदिर,प्रभुआळी गणपती मंदिर अशा विविध ठिकाणी असलेल्या मंदिरास सुध्दा आकर्षक विदयुत रोषणाई व फुलांची आरास करून सजविण्यात आले होते.पहाटे पासुन अभिषेक, काकडा आरती, प्रवचन भजन,किर्तन व महाप्रसादाचे आयोजन मंदिर व्यवस्थापका कडुन करण्यात आले होते.त्यामुळे भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. भिवंडी तालुक्यातील अंजूर या गावामध्ये पेशवेकालीन इतिहास लाभलेला श्री.सिद्धिविनायक मदिर असुन येथे सुद्धा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
भिवंडी तालुक्यातील विविध गावातील गणेश मंदिरात सुध्दा भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. तसेच जयंती निमित्त घरामध्ये गणपती मूर्तीची स्थापणा करून उत्सव आयोजित करून पालखी व प्रसाद सोहळ्याचे आयोजन केले होत.