भिवंडी ( प्रतिनिधी) भिवंडी शहर परिसरात पोलीस असल्याची बतावणी करून सोन्याचे दागिने व किमंती ऐवज चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे यांच्या विशेष पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने सापळा रचून ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याच्या कडून सुमारे नऊ लाख 28 हजार रुपये किमंतीचे सोन्याचे दागिने ऐवज पोलिसांनी हस्तगत करण्यात केले असुन या प्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

जब्बार अजीज जाफरी (वय 58 वर्षे रा.वाशिंद पूर्व, ता. शहापूर, जि.ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या संशयित इसमाचे नांव आहे. निजामपुरा पोलीस स्टेशन हद्दी मध्ये 26 मे 2024 रोजी शहरातील नदीनाका येथे एका मोटर सायकलस्वारास रस्त्यात अडवून मी क्राईम ब्रँच मधून आलो असून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने किती लोक दागिने घालून फिरतात त्यांची नोंद घेत असल्याचे सांगून तुम्ही तुमच्या गळ्यातील सोन्याची चैन काढून खिशात ठेवा असे सांगत त्याच्या हाती दगड असलेली कागदी पुडी देऊन सोन्याचे दागिने चोरी केले होते.
याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.त्यामुळे निजामपूरा पोलीस व भिवंडी गुन्हे शाखेचे पोलीस समांतर तपास करीत असता गुन्हे शाखेचे वपोनि जनार्दन सोनावणे यांन मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे त्यांनी पोलीस उपाआयुक्त अमरसिंह जाधव,सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पाटील,माया डोंगरे, पोहवा शशिकांत यादव,
किशोर थोरात,उमेश ठाकुर,नितीन बैसाणे यांच्या पोलीस पथकासह सापळा रचून संशयीत इसम नामे जब्बार अजीज जाफर यांस मुंबई नाशिक महामार्गा वरील भिवंडी बायपास रांजनोली नाका भागात सापळा रचून ताब्यात घेऊन सखोल कौशल्यपूर्ण चौकशी करून त्यांच्या कडून 116 ग्रँम वजनाचे सुमारे नऊ लाख 28 हजार रुपये किमंतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत करण्यात केले आहेत. सदर आरोपीने यापूर्वी निजामपुरा,नारपोली,भोईवाडा, भिवंडी शहर, विठ्ठलवाडी व कळवा पोलीस ठाणे हद्दीत फसवणुकीचे 6 गुन्हे केले असल्याचे चौकशी तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.पुढील तपास निजामपूरा पोलीस करीत आहेत.