भिवंडीसह ठाणे व पालघर जिल्ह्यात जनता दरबार घेणार – गणेश नाईक
भिवंडी ( भानुदास भसाळे ) ठाणे जिल्ह्याचा मी सलग पंधरा वर्षे पालकमंत्री राहिलेलो आहे.पंधरा वर्षे कोणी पालकमंत्री झालेला नाही आणि भविष्यात ही होणार की नाही मला शंका आहे असे धाडसी वक्तव्य राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केले आहे.तसेच पालघर जिल्हा व संपूर्ण ठाणे जिल्ह्यात लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार घेणार असल्याची माहिती गणेश नाईक यांनी दिली. त्यामुळे आता शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गडाला धक्का बसणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

भिवंडी तालुक्यातील मानकोली येथील क्रीडांगणावर कपिल पाटील फाउंडेशन व भारतीय जनता पार्टी भिवंडी तालुका यांच्यावतीने आयोजित माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले,कपिल पाटील यांसह प्रशांत पाटील,देवेश पाटील, सुमित पाटील,सिद्धेश पाटील,स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष प्रताप पाटील यांच्यासह भाजप पक्षाचे.पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ युवा खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी गणेश नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की पालघर त्यानंतर नवी मुंबई व ठाणे येथे जनता दरबार पार पडले असुन लवकरच भिवंडी,शहापूर, मुरबाड,अंबरनाथ,बदलापूर कल्याण, वसई, वाडा,जव्हार,मोखाडा या सर्व सर्व तालुक्यांमध्ये मी जनता दरबार घेणार आहे.

भाजप पक्ष वाढविणे व जनतेची काम तातडीने निकामी काढून सर्व सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी हा जनता दरबार असणार आहे.ज्यांना उभारी घ्यायची असते त्यांना फक्त परमेश्वराची कृपा असावी लागते आणि सच्छिलता असावी लागते आणि ती आमच्या मध्ये आहे असे सांगत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांव न घेता कोपरखळी मारली आहे.कपिल पाटील हे आता सतर्कपणे लोकांची काम करीत आहेत त्यामुळे त्यांच्या पाठीशी मी सर्व ताकद लाऊन उभा राहणारा आहे भविष्यकाळ कपिल पाटील यांचा आहे असा विश्वास गणेश नाईक यांनी यावेळी व्यक्त केला.
होतकरू युवकांना भारतीय क्रिकेट संघातून खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळावं म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहि माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी यावेळी दिली.
चौकट
या क्रिकेट स्पर्धेत लाखो रुपयांची पारितोषिके व मोटरसायकली,कार
विविध गटांमधील विजेता संघांना दिले जाणार असुन 12 दिवस आणि रात्र होणाऱ्या सत्रात भिवंडी,ठाणे व रायगड जिल्ह्यातील संघ सहभागी होणार आहेत.