भिवंडीत धर्मराजा चषक स्पर्धेला जल्लोषात सुरुवात..
भिवंडी ( प्रतिनिधी ) क्रिकेट हा जगामध्ये सुप्रसिद्ध असलेला खेळ आहे या खेळाच्या माध्यमातून सामाजिक व जातीय एकता निर्माण होत असते खेळाच्या माध्यमातून अनेकांना शासकीय नोकरी मिळते तसेच त्यांचे जीवन हे उज्वल झालेले आहे.त्यामुळे खेळाला शासकीय व सामाजिक संस्थांनी जास्तीत जास्त प्रोत्साहन देणे गरजेचे आहे असे मत भिवंडी महापालिकेचे जेष्ठ माजी नगरसेवक निलेश चौधरी यांनी आयोजित कार्यक्रमात केले.

भिवंडीतील ठाकरचापाडा क्रीडानगरीत मैदानात गतवर्षीप्रमाणे शालेय विद्यार्थी व होतकरू युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी धर्मराजा ग्रुपचे संस्थापकध्यक्ष माजी जेष्ठ नगरसेवक नीलेश चौधरी यांच्या माध्यमातून दिवस व रात्र क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आले असून त्याचे उद्घाटन निलेश चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी गटनेते हनुमान चौधरी,सामाजिक कार्यकर्ते विराज पवार, नितेश ऐनकर,मयूर चौधरी, कपिल ऐनकर, नितीन बजागे,कल्पेश ठाकूर, युगांत चौधरी, स्वराज चौधरी, संदीप बजागे अदी मान्यवर उपस्थित होते.

सतत पाच दिवस होणाऱ्या या स्पर्धेत शहर व ग्रामीण भागातील 50 क्रिकेट संघाने सहभाग घेतला असून विजेत्यांना तसेच उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंना रोख रक्कम व चषक प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती चौधरी यांनी दिली.युवा खेळाडू व क्रिकेट प्रेमींचे मनोबल वाढवणे आणि देशासाठी खेळून आपल्या भिवंडीचा गौरव वाढविणे करणे हाच आमचा संस्थेचा उद्देश असल्याचे त्यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले यावेळी क्रीडा प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रम स्थळी गर्दी केली होती.