बदलापूर – :कल्याण-बदलापूर आणि कल्याण-कसारा दरम्यान तिसऱ्या व चौथ्या रेल्वेमार्गासाठी भूसंपादनातील अडचणी सर्वोच्च प्राधान्य देऊन सोडविण्यात येतील.प्रवासी सेवा सुविधा पूर्ण केल्या जातील, अशी ग्वाही रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.स्थानकात पाच एक्सलेटर, तीन लिफ्ट आणि दोन १२ मीटरचे प्रशस्त पादचारी पूल आदी कामे ८३ कोटी रुपये खर्चून केली जात आहेत, असे मंत्री दानवे यांनी जाहीर केले.
बदलापूर रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्मचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

अध्यक्षस्थानी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील होते. या वेळी आमदार किसन कथोरे, मध्य रेल्वेचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक शशीभूषण, माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे आदीं व्यासपीठावर उपस्थित होते.
बदलापूर रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे दिल्लीत पाठपुरावा करीत आहेत.कल्याण-बदलापूर आणि कल्याण-कसारा दरम्यान तिसऱ्या व चौथ्या मार्गातील भूसंपादनाच्या अडचणी सोडविल्या जातील. ८३६ कोटी रुपयांचा कल्याण-
मुरबाड रेल्वेप्रकल्प मंजूर झाला आहे. कल्याण-बदलापूर दरम्यान रेल्वेमार्गासाठी १५०० कोटी रुपये दिले आहेत. रेल्वे प्रवाशांच्या सुविधांसाठी निधी उपलब्ध केला जाईल असे त्यांनी सांगितले.
टिटवाळा उड्डाणपुलाचे लोकार्पण
टिटवाळा – रेल्वे प्रकल्पांची कामे वेगाने सुरू आहेत. भिवंडी लोकसभा क्षेत्रातील रेल्वे प्रकल्पांची कामेही वेळेत पूर्ण होतील, अशी ग्वाही केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी येथे दिली.टिटवाळा पूर्व व पश्चिम भाग जोडणाऱ्या रेल्वे उड्डाण पुलाचे (आरओबी) लोकार्पण रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्या हस्ते झाले.यावेळी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील,यावेळी पालिका आयुक्त इंदूराणी जाखड रेल्वे व्यवस्थापक रजनिशकुमार गोयल, माजी उपमहापौर उपेक्षा भोईर, शक्तिवान भोईर,उपस्थित होते.मध्य रेल्वे व पालिकेने एकत्र येऊन ८४१ मीटर लांबीचा उड्डाणपूल ५० कोटी ५४ लाख रुपये खर्चून उभारला आहे.रेल्वे पुलामुळे टिटवाळा शहराच्या विकासाला वेग येईल. अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेत टिटवाळा स्थानकाच्या विकासासाठी २९ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तर गुरवली,खडवली, वेहळोली येथे रेल्वे उड्डाणपूल व अंडरपासची कामे मंजूर झाली आहेत, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली.