भिवंडीत विनामूल्य महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न…

भिवंडी

भिवंडी ( प्रतिनिधी ) आयुष्य मंत्रालय भारत सरकार व आयुष्य संचांलनालय महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने  भिवंडीत जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कृष्णा गाजेंगी यांच्या पुढाकाराने महिलांसाठी मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर सकाळी आयोजित करण्यात आले होते.या शिबिरात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेऊन तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य चिकित्सा तपासणी व उपचाराचे निदान करून घेतले.


     भिवंडी शहरातील कोंबडपाडा येथील गावदेवी मंदिर सभागृहात हे आरोग्य चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात रक्त तपासणी,मधुमेह,
हाडांची ठिसूळपणा, संधिवात व इतर विविध आजाराचे परीक्षण डॉक्टरांच्यावतीने करण्यात आले तसेच महिलांना औषध वैद्यकीय सल्ला देऊन आजारापासून कसा बचाव करावा याबाबत माहिती देण्यात आली .

या शिबिराचे उद्घाटन भाजपाचे शहराध्यक्ष अँड.हर्षल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले,प्रसंगी माजी नगरसेवक दत्तात्रय कोलेकर,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कृष्णा गाजेंगी,रवी सावंत, विकास बाफना,राजू गाजेंगी, नागेश झपांल यांच्यासह भाजप पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते,महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी 400 हून अधिक महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.यावेळी डॉक्टरांनी चांगले सहकार्य केल्याने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *