भिवंडीत नागरिकांच्या मदतीला मुसळधार पावसात मदतीला धावला स्पायडरमॅन..

भिवंडी

महापौरांनी घेतला पुरजन्य परिस्थितीचा आढावा.

भिवंडी ( शरद भसाळे ) चार दिवसापासून सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सार्वजनिक रस्त्यावर पाणी साचून पुरजन्य परिस्थिती.निर्माण झाली आहे. गटार व नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने सखल भागात राहत असलेले झोपडपट्टी व घर दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे नागरिकांच्या मदतीला महापालिका आपत्कालीन विभाग कर्मचारी तसेच काही नगरसेवक,
समाजसेवक हे मदत कार्य करीत असतानाच आता रस्त्यावर ” स्पायडरमॅन ” चा पोषाख (गणवेश)घालून घातलेला एक तरूण युवक महिला व शालेय विद्यार्थी नागरिकांना मदत कार्य करीत आहे त्यामुळे सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.दरम्यान आयुक्त अनमोल सागर व महापौर नारायण चौधरी यांनी पाऊस परिस्थितीचा आढावा घेऊन मनपा कर्मचाऱ्यांना सतर्क राहून काम करण्याचे सुचना देऊन पुरग्रस्त ठिकाणांची पाहणी केली.


भिवंडी शहर परिसरात गेल्या चार दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून टोरट पावर चा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे महिला व नागरिकांना तसेच हॉस्पिटल मधील रुग्णांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला,टोरंट पावर कंपनीच्या या गलथन कारभाराबाबत नागरिकांसह आमदार महेश चौगुले व आ.रईस शेख यांनी सुद्धा तीव्र नाराजी व्यक्त केली असून कंपनीवर शासनाने कारवाई करावी अशी मागणी केली आहे. पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होणार नाही याबाबत व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक होते मात्र टोरंट कंपनीकडून कोणत्याही नियोजन न केल्यामुळे गेल्या काही दिवसापासून शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित केला जात आहे,मोबाईल फोन व दुरध्वनी वर टोरंट कर्मचाऱ्यांशी संपर्क केला असता समाधानकारक उत्तर देत नाहीत तर काही जण फोन सुध्दा उचलत नसल्याची तक्रार समाजसेवक सलाम शेख, शादाब उस्मानी यांनी केली आहे,त्यामुळे पोलिस उपाआयुक्त डॉ. पवन बनसोड यांनी मोहरम निमित्त आयोजित बैठकीत सुद्धा अनेक नागरिकांनी टोरंट विरोधात तक्रारी केल्याची माहिती नागरिकांनी दिली.
पावसाळ्यात शहरात पुरजन्य परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी
महापालिकेने ठेकेदारांची नेमणूक केली मात्र ठेकेदारांने गटार व नालेसफाई चे काम व्यवस्थित न केल्यामुळे गटारातील सांडपाणी मुख्य रस्त्यावर वाहून जात होते त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली होती.भिवंडी शहरातील छ.शिवाजी चौक,खाडीपार रोड,अजय नगर रोड,तीनबत्ती चौक,कल्याण रोड,शिवाजी नगर भाजीपाला मार्केट,
गोपाल नगर,कासार आळी,निजामपूरा,दरगाह रोड, ब्राह्मण आळी अंबिका नगर,अंजुर फाटा रोड, होली मेरी हायस्कूल मार्ग,अशा विविध भागात असलेल्या सखल भागात पाणी साचल्याने सर्वत्र रस्त्यावर पुरजन्य परिस्थितीती निर्माण झाली आहे.त्यामुळे नागरिकांचे हाल झाले होते अशावेळी रस्त्यावर ” स्पायडरमॅन ” चा पोषाख (गणवेश)घालून घातलेला एक युवक महिला व शालेय विद्यार्थी,नागरिकांना रस्त्यावरील सखल भागातून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी मदत कार्य करीत आहे. अनेक मोटारसायकली पाण्यात बंद पडल्याने त्या धक्का देत बाहेर काढून देत होता त्यामुळे नागरिकांनी त्याचे आभार मानले.मुसळधार पावसामुळेझोपडपट्टी भागातील सखल भागात पाणी साचून लोकांच्या घरात झोपडीत व दुकानात पाणी शिरले होते त्यामुळे त्यांची तारांबळ उडाली होती.खराब रस्त्यावरील खड्डयात पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली होती,त्यामुळे वाहतूक संथ गतीने होत होती त्यामुळे अनेक ठिकाणी वाहनांची कोंडी झाली होती.
महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापण विभागाचे प्रमुख शाकीब खरबे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी
महापालिका आयुक्त अनमोल सागर,महापौर नारायण चौधरी यांच्या आदेशानुसार पूरग्रस्तांना अल्पोहार व खाद्यपदार्थ देऊन मदत केली.