भिवंडी (शरद भसाळे ) भिवंडी शहर परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने पाणी सार्वजनिक रस्त्यावर साचणे,दमट हवामान आणि संसर्गजन्य रोगांचा त्यामुळे धोका वाढला आहे.याची दखल घेत भिवंडी महापालिका व डॉक्टरांच्या आरोग्य वैद्यकीय विभागाच्यवतीने मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप गाडेकर यांनी नागरिकांना स्वतः ची सतर्क राहून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
पावसाळ्यात हवामान बदल होत असल्याने डेंग्यू, मलेरिया, लेप्टो, कॉलरा आणि सर्दी-तापाचे रुग्ण या काळात मोठ्या प्रमाणात वाढतात.त्यामुळे आजाराला प्रतिबंध करणे हाच सर्वोत्तम उपाय असल्याची माहिती तज्ज्ञ डॉ.संदीप गाडेकर,
डॉ.जयवंत धूळे व डॉक्टर असोसिएशन डॉ. प्रसन्न सोमन, डॉ.राजेश दहापुते यांनी दिली.पावसाळा सुरू झाला असुन नागरिकांनी आपले आरोग्य चांगले व निरोगी ठेवण्यासाठी पाणी नेहमी उकळून किंवा फिल्टर केलेले पाणी प्यावे.शिळे अन्न व रस्त्यावरील कापलेली फळे, उघड्यावरचे अन्न पदार्थ सेवन करणे टाळा तसेच हात धुण्याची सवय लावा असे आवाहन त्यांनी केले आहे.डास प्रतिबंध करण्यासाठी घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. कुंड्या, टायर, पडक्या भांड्यातील पाणी दर आठवड्याला रिकामे करा. रात्री डासांची बाधा टाळण्यासाठी मच्छरदाणी किंवा रिपेलेंट वापर करा अशी माहिती डॉ.जयवंत धूळे,डॉ. प्रसन्न सोमन यांनी दिली. पावसात भिजल्यानंतर लगेच अंग कोरडे करा.ओले कपडे, बूट ताबडतोब बदला. चिखलाच्या पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर पाय साबणाने स्वच्छ धुवा, कारण लेप्टोचा धोका असतो त्यामुळे लहान मुलांसह कुटुंबातील सदस्यांची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत डॉ. राजेश दहापुते यांनी व्यक्त केले आहे.
पावसाळ्यात ताप, अंगदुखी, उलटी, अतिसार किंवा डोळे पिवळे झाल्यास त्वरित महापालिकेच्या आरोग्य केंद्र अथवा दवाखान्यात जाऊन डॉक्टरांकडे जाऊन औषध उपचार करून घेणे आवश्यक असल्याचे मत डॉ.संदीप गाडेकर यांनी व्यक्त केले आहे.
महापालिकेच्या वैद्यकीय व आरोग्य विभाग प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की साथीचे आजार रोखण्यासाठी डॉक्टर व मनपा प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन
असे आवाहन भिवंडी महापालिकेच्या वैद्यकीय व आरोग्य विभाग प्रशासनाने केले आहे.

