भिवंडी (भानुदास भसाळे )पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळाचे बी.एन.एन. महाविद्यालय भिवंडी,आय.क्यु.ए.सी.विभाग,मराठी विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी राजभाषा गौरव दिन व ग्रंथ प्रदर्शन महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते.मराठी राजभाषा कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉ.राजेंद्र डोंगरदिवे होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक वाघ यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. आय.क्यु. ए.सी. विभागाचे समन्वयक डॉ.शशिकांत महाळुंकर,उपप्राचार्य डॉ.भदरगे व उपप्राचार्य डॉ.सुवर्णा रावळ,ग्रंथालय समितीचे सदस्य प्रा.रंगारी,मराठी विभागाच्या डॉ.अलका कदम, ग्रंथालय विभागाचे ग्रंथपाल माधव मुंडे अदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमात प्राचार्य वाघ यांनी बालगीते,अभंग व आधुनिक साहित्य याबाबत मौल्यवान माहिती दिली.तरप्रा.डोंगर यांनी मराठी भाषा गौरवदिनाचा उगम कसा झाला राजभाषा दिन जागतिक भाषादिवस यातील फरक स्पष्ट करत गजानन शिरवाडकर ते वि.वा शिरवाडकर यांच्या बालपणाचा क्रम उलगडत कुसुमाग्रजांच्या कविता, नाटके,कथा,यातील सामाजिक,राजकीय ताकद,आणि कवितेचा उगम ते तिचे अर्थनिर्णयन कसे करावे यावर विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक ग्रंथपाल माधव मुंडे तर सूत्रसंचालन डॉ.अलका कदम यांनी केले.आभार प्रदर्शन सहाय्यक ग्रंथपालसंगीता प्रधान व्यक्त केले.