भिवंडी (प्रतिनिधी ) भिवंडी तालुक्यातील भरोडी या गावात झालेल्या एका घरफोडीच्या घटनेत सुमारे साडे अकरा लाखांच्या दागिन्यांची व रोख रक्कम चोरी झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बिपीन सुरेश भोईर ( वयः25.रा.भरोडी.भिवंडी )हे घरात नसताना मध्यरात्रीच्या सुमारास घराच्या दरवाज्याचा तसेच घरातील दोन बेडरूमचा लॉक अज्ञात चोरट्यांनी तोडून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने कपाटातील 11 लाख 65 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून पळून गेले आहेत.या बाबत बिपीन भोईर यांनी दिलेल्या तक्रारीवरून नारपोली पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मोरे करीत आहेत.
