भिवंडी पोलीस उपाआयुक्तांची उपस्थिती.
भिवंडी ( भानुदास भसाळे ) पवित्र महिना रमजान महिना दिनानिमित्ताने शहरातील विविध ठिकाणी सामाजिक संस्था व राजकीय पक्षाच्यावतीने रोजा रोजा इफ्तार” चे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.त्या अनुषंगाने भिवंडी शहरातील निजामपूरा व व शहर पोलीस
स्टेशनचावतीनेे पोलीस ठाण्याचे प्रांगणात मुस्लिम समाज बांधवासाठी ” रोजा इफ्तार ” पार्टी शुक्रवारी सायंकाळी आयोजित करण्यात आली होती यावेळी पोलीस उपाआयुक्त मोहन दहीकर,सहाय्यक पोलीस आयुक्त दिपक देशमुख यांच्या सह शहरातील मान्यवर नागरीकांसह मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असुन लवकर रमजान ईद भिवंडीत मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता भाईचारा या भूमिकेतून
भिवंडी पोलीस उपा आयुक्त मोहन दहीकर यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास ढगळे, शहर पोलीस ठाण्याचे वपोनि कृष्णदेव खराडे यांच्या पुढाकाराने निजामपूरा भागातील पोलीस ठाण्याचे प्रांगणात रोजा इफ्तार पाटीँ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस उपआयुक्तानी उपस्थित मुस्लिम समाज बांधवांना रमजान महिना निमित्ताने शुभेच्छा दिल्या आणि एकात्मता व भाईचारा टिकवून ठेवण्याचे आवाहन केले.यावेळी अँड.नियाज मोमीन, वसीम खान,सलाम शेख,इरफान पटेल यांच्या सह मान्यवर उपस्थित होते. शहरातील भोईवाडा, शांतीनगर, कोनगांव या पोलीस ठाण्याचे हद्दीत सुध्दा रोजा इफ्तार आयोजित कार्यक्रमात शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.