शिवजयंती उत्सवा निमित्त  भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मिरवणूक..

भिवंडी

भिवंडी (भानुदास भसाळे) भिवंडी शहरातील छ्त्रपती शिवाजी महाराज चौकात सालाबाद प्रमाणे तिथीनुसार 
शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत असुन
या निमित्ताने शहरातील विविध भागात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित सजिव व निर्जीव देखावे सार्वजनिक उत्सव मंडळाचेवतीने उभारण्यात आले आहेत तसेच विविध कार्यक्रम सुध्दा करण्यात आले.आज सायंकाळी भिवंडी शहर शिवजयंती उत्सव समीतीचे
वतीने शहरातील विविध भागातून वाजतगाजत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची आकर्षक मिरवणूक काढण्यात आली.


त्यामध्ये हजारो शिवप्रेमी नागरिक महिलावर्ग सहभागी झाले होते.यावेळी शहरात विशेष पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता.शिवजयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौकात केलेल्या आकर्षक सजावटीचे मंडपातील मखरात काल रविवार सायंकाळी ५ वाजता शिवप्रतिमेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर चौकातील असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास समाजसेवक कृष्णा गाजेंगी,माजी आमदार रुपेश म्हात्रे,शिवसेना शहराध्यक्ष सुभाष माने,महिला आघाडी अध्यक्षा वैशाली मेस्त्री व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी उत्सव समितीचे पदाधिकारी,
महिला वर्ग,शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी महिलांना प्रोत्साहन देण्यासाठ खेळ पैठणीचा कार्यक्रम करीत विविध आकर्षक भेटवस्तू  देण्यात आल्या.तसेच गर्जा महाराष्ट्र या वाद्यवृंदाचा कार्यक्रम करण्यात आला.
चौकट
सोमवारी सायंकाळी 6:15 वा.विद्युत रोषणाई व फुलांनी सजविण्यात आलेल्या घोडागाडी बग्गीत ” शिवप्रतिमा ” विराजमान करून
त्यास उपस्थित मान्यवर व भिवंडी पोलीस दलाच्या
वतीने पुष्पहार अर्पण करून ढोल ताशांच्या गजरात वाजतगाजत  शिवाजीनगर येथून मिरवणूक काढण्यात आली होती.प्रसंगी आमदार महेश चौगुले,शिवसेना नेते प्रकाश पाटील, माजी आमदार रूपेश म्हात्रे,माजी उपमहापौर मनोज काटेकर,माजी सभापती बाळाराम चौधरी,प्रशांत लाड, भिवंडी शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज गगे,साईनाथ पवार,
शाम पाटील,मदन भोई, गणेश मोरे, महेश जगताप,यांच्या सह शिवप्रेमी नागरिक,महिला व विविध पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते सहभागी झाले होते.या मिरवणुकीत शहर परिसरातील विविध सार्वजनिक शिवजयंतीत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आकर्षक चित्ररथ व छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा रथावर ठेऊन वाजतगाजत उत्साहात सामील झाले होते.आकर्षक तारपा नुत्य, खेळ व तालीम करणारे कलाकार सहभागी झाले होते.शिवाजी नगर, तीनबत्ती चौक, नवीचाळ,प्रभुआळी मंडई,झेंडानाका वाणीआळी, टिळक चौक,कासार आळी मार्गाने ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकात समाप्त करण्यात आली.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास उपस्थित पाहुण्याचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जैनाचार्य
महाबोधी सुरेश्यरजी महाराज व
शिवसेना नेते प्रकाश पाटील यांनी शिवप्रेमी नागरिकांना मार्गदर्शन केले.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
जीवनावर आधारित देखावे सादर करणाऱ्या शिवजयंती उत्सव मंडळांना भिवंडी शिवजयंती उत्सव समितीचेवतीने पारितोषिक देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *