भिवंडीत शिक्षिकेस घातला साडेतीन लाखांचा ऑनलाईन गंडा..

भिवंडी

भिवंडी (प्रतिनिधी) भिवंडी शहरातील शिक्षिका असलेल्या महिलेस एका अज्ञात व्यक्तीने बँकेतून बोलत असल्याचे सांगत सुमारे साडे तीन लाखांचा ऑनलाईन गंडा घालून फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.याबाबत भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अरुणा दासू नल्ला ( वयः 49 रा.कणेरी. भिवंडी.)असे फसवणूक झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे.सदर शिक्षिका अरुणा नल्ला या कणेरी येथील घरी असताना त्यांना भरत कुमार नावाच्या अज्ञात व्यक्तीने आपण अक्सिस बँकेतून बोलत असल्याचे सांगत त्यांच्या क्रेडिट कार्ड संकेत स्थळावर वापरण्या बाबत क्रिया करायला सांगून त्यांच्या बचत खात्यातून एकूण 3 लाख 52 हजार 995 रुपये आपल्या खात्यात वळते करून त्यांची फसवणूक केली.त्यामुळे या बाबत महिलेने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन झालेल्या प्रकारा बाबतीत पोलिसांना माहिती दिली त्यामुळे त्यांनी  दिलेल्या तक्रारी वरून भिवंडी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डगळे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *