महिलांनी पारंपरिक वेषभूषा करून  भिवंडीत होळया प्रज्वलीत केल्या,तरूणाईने रंगाने भरलेल्या प्लास्टिकच्या थैल्या फोडत धुळवड केली साजरी..

भिवंडी

भिवंडी (भानुदास भसाळे )भिवंडी शहर व परिसरांत रविवारी सायंकाळी होळी प्रज्वलन आणि आज सोमवार रोजी धुळीवंदनाचा रंगोत्सवाचा कार्यक्रम मोठय़ा उत्साहात व आनंदात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.प्लास्टिक बंदी असताना सुध्दा अनेक ठिकाणी रंगाने भरलेले फुगे व छोटय़ा प्लास्टिकच्या थैल्यांचा वापर मोठ्या प्रमाणात करीत पालिकेच्या आवाहनाला तिलांजली देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या सणाचा पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार घडु नये यासाठी पोलिसांना सर्वत्र विशेष पोलीस बंदोबस्त तैणात केला होता.शहर व ग्रामीण भागात सुमारे 250 हुन अधिक होळया प्रज्वलित करण्यात आल्या.दरम्यान आज धूळीवंदन निमित्ताने मुख्य बाजारपेठ परिसरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकान बंद ठेवून उत्सवात सहभागी होत आनंद घेतला.


होळी उत्सव व धुळीवंदना निमीत्ताने सार्वजनिक खाजगी युवा मंडळाकडून भिवंडी शहरातील विविध चौकात स्पिकर लावून नृत्य करीत रंगोत्सव साजरा केला. तत्पुर्वी रविवारी रात्री होळी पौणिमे निमीत्ताने शहरातील कासारआळी,
नवीचाळ,कोंबडपाडा,ब्राम्हणआळी, ठाणगे आळी,पारनाका बाजारपेठ,कुंभारआळी,भादवड,टेमघर, प्रभूआळी, कामतघर,काप आळी,भोईवाडा अशा विविध भागातील चौकातील रस्त्यावर पारंपारीक पध्दतीने होळ्या पेटविण्यात आल्या. या निमीत्ताने महिलांनी होळी चे विधीपुर्वक पुजन केले. तसेच तरूणांनी देखील सहभागी होत होळी पेटविण्याचा आनंद लुटला.आज सोमवार धुलीवंदना निमीत्ताने सोमवारी सकाळपासून युवकांनी एकत्रीत फिरून एकमेकांना रंग लावीत रंगोत्सवाचा आनंद लूटत होते.अनेकांनी केमीकलयुक्त रंगाची उधळण केली. तर सुजाण युवकांनी इकोफ्रेण्डली कोरडय़ा रंगाचा रंगोत्सव मोठय़ा आनंदात साजरा केला. शहरातील काही दुकानात सर्रासपणो लहान प्लास्टिकच्या पिशव्यांची व विविध रंगाची सर्रासपणो विक्री सुरू होती.


रस्त्यावर फुगे व प्लास्टिक पिशव्यांचा खच पडला होता.ढोलकीवर गाणी वाजवित धुळवड साजरी केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता भंग होऊ नये कोठेही अनुचित प्रकार घडु नये यासाठी भिवंडीत ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या निर्देशानुसार पोलीस उपाआयुक्त श्रीकांत परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचावतीने  होळी ची पोळी दान करा हा उपक्रम राबविण्यात आला.

भोईवाडा येथे कोळी 
समाजाकडून होळी सण पारंपरिक 
पद्धतीने धुमधडाक्यात साजरा
करण्यात आला.
होळीला फुलांनी सजवून त्याला विविध प्रकारच्या
” मासे ” बांधण्यात आले होते.खांद्यावर पालखी
घेऊन होळीची वाजत गाजत मिरवणूक 
काढण्यात आली.
यावेळी कोळी महिला व लहान मुली पारंपारिक वेशभूषेत नृत्य करीत उत्सवाचा आनंद घेत होते.होळीची 
पूजाअर्चना 
करून महिलां कडून 
होळीला नारळ वाहण्यात आला.
हा उत्सव गेल्या 80 वर्षांपासून  साजरा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *