भिवंडी ( प्रतिनिधी ) शिधावाटप कार्यालयात मोठ्या प्रमाणात गलथान व भ्रष्ट कारभार सुरू असल्याची ओरड
होत आहे. तसेच शिधापत्रिका काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्थ कारण सुरू असुन कार्यालयात करण्यासाठी दलालांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरिक त्रस्त झाला असुन नागरिकांना दिलासा देण्यासाठी भिवंडी भाजपा पूर्व विधानसभा निवडणूक प्रमुख संतोष शेट्टी यांनी पुढाकार घेत शासन आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून 250 कुटुंबीयांना मोफत शिधावाटप पत्रिका मिळवून दिली आहेत.

त्यांचे वितरण संतोष शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आल्याची माहिती कार्यालयातून देण्यात आली. संतोष शेट्टी यांच्या जनसंपर्क कार्यालयात सर्व सामान्य नागरिकांचे समस्या निराकरणासाठी विशेष कक्ष सुरू करण्यात आला आहे.शालेय विद्यार्थी, नागरिकांना आवश्यक असलेले शैक्षणिक दाखले,शिधावाटप पत्रिका व इतर शासकीय प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी कार्यालयातून काम केली जात असल्याची माहिती राकेश मंडळ यांनी दिली. शिधावाटप पत्रिका बनविण्यासाठी नागरिकांना आर्थिक भार सोसून कार्यालयात हेलपाटे घालावे लागत असल्याने त्यांचा त्रास व आर्थिक खर्च वाचावा या भावनेतून हे काम यापुढे ही सुरू राहणार आहे. नागरिकां कडे शिधावाटप पत्रिका नसल्याने केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ अशा कुटुंबीयांना मिळत नव्हता आता पर्यंत विविध दाखल्यांसह सुमारे 1500 हून अधिक शिधावाटप पत्रिका वितरित करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुध्दा घेता येणार आहे.अशी माहिती संतोष शेट्टी यांनी दिली आहे.