भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांच्या विशेष पोलीस पथकाने शहरात घरफोडी व वाहन चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगार आरोपींना मोठ्या शिताफीने तपास करीत ताब्यात घेऊन अटक केली आहे. अधिक चौकशीतून सहा गुन्ह्यांची उकल करीत त्याच्या जवळून सुमारे सात लाख ३९ हजार ४०० रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आजाद सिंग उर्फ धनरी मधुसिंग टाक (वय ३३ वर्षे) व अजय सिंग उर्फ मामू भूरासिंग दुधानी (वय २८ वर्षे,दोघे रा.दिडोली, सुरत,
राज्य गुजरात) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.ठाणे पोलीस आयुक्तालयात घरफोडी चोरीच्या होणाऱ्या घटनांना आळा घालण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिले असुन दिलेल्या सूचनांनुसार उपाययोजना सुरू असतानाच सदरचे गुन्हे उघड करण्यात भिवंडी गुन्हे शाखेचा पोलिस पथकास यश मिळाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शीतल राऊत यांच्या पोलिस पथकास मिळालेल्या माहिती वरून त्यांनी तांत्रिक विश्लेषणाचे आधारे संशयित आरोपींची माहिती घेऊन गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीराज माळी,मिथुन भोईर,
उपनिरीक्षक रविंद्र पाटील,राजेश शिंदे,रामचंद्र जाधव,सुधाकर चौधरी, सुनिल साळुंखे,निलेश बोरसे,प्रशांत राणे,प्रकाश पाटील,सुदेश घाग,शशिकांत यादव,साविर शेख,राजेश गावडे,वसंत चौरे, रंगनाथ पाटील,वामन भोईर,किशोर थोरात, योगेश कवडे,अमोल इंगळे,सर्फराज तडवी, विजय कुंभार,भावेश घरत,रविंद्र साळुंखे व माया डोंगरे,अनुष्का पाटील,दक्षता सुतार, सायली गंभेरा या पोलीस पथकाने परिसरात सापळा रचून आजाद सिंग उर्फ धनरी मधुसिंग टाक व अजय सिंग उर्फ मामू भूरासिंग दुधानी यांना ताब्यात घेत चौकशी करून नारपोली पोलीस ठाण्यातील चार तर कोनगाव व विरार पोलिस ठाण्यातील प्रत्येकी एक अशा सहा घरफोडी व वाहन चोरीच्या गुन्ह्यांची उकल केली आहे.त्याच्या जवळून सुमारे सात लाख ३९ हजार ४०० रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
खेच्या पोलिसांनी दोघा सराईत आरोपींना अटक करून सात लाखाचा मुद्दे माल हस्तगत करीत सहा गुन्हे उघडकीस आणले..
भिवंडी ( प्रतिनिधी )
भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांच्या विशेष पोलीस पथकाने शहरात घरफोडी व वाहन चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगार आरोपींना मोठ्या शिताफीने तपास करीत ताब्यात घेऊन अटक केली आहे. अधिक चौकशीतून सहा गुन्ह्यांची उकल करीत त्याच्या जवळून सुमारे सात लाख ३९ हजार ४०० रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.