मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना भिवंडी पोलिसांना केली अटक;23  लाखांचा मुद्देमाल जप्त.

भिवंडी

भिवंडी ( प्रतिनिधी  ) भिवंडी शहरातील कल्याण रोड परिसरातील एका
मोबाईल विक्री करणाऱ्या दुकानातून मोबाईल फोन,
लॅपटॉपसह इतर साहित्य चोरी प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी शिताफीने तपास करीत दोन चोरट्यांना अटक करून त्यांच्या कडून २३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपाआयुक्त शशिकांत बोराटे यांनी  दिली आहे.
साहिद मोहम्मद उर्फ दबंग जफरुद्दीन अन्सारी (वय २० वर्ष) व उजेर अहमद इस्लाहुर रहमान खान (वय २३ वर्ष दोघेही रा. न्यू आजाद,नगर शांतीनगर) असे अटक आरोपींची नावे आहेत.
भिवंडी शहरातील कल्याण नाका परिसरातील सिटी झोन या मोबाईल दुकानात मोबाईल व लॅपटॉपसह इतर साहित्य चोरी झाल्याची घटना ६ फेब्रुवारी रोजी घडली होती.याप्रकरणी शांतीनगर पोलीस  ठाण्यात ८ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल  करण्यात आला होता.या गुन्ह्याचा तपास पोलीस उपाआयुक्त शशिकांत बोराटे,
सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या विशेष पथकाने तपास सुरू केला असता मिळालेल्या माहितीनुसार पोलोसांनी साहीद व उजेर या दोन आरोपींना ताब्यात घेऊन अटक करून चौकशी अंती त्यांच्याकडून १०८ मोबाईल, एक लॅपटॉप व इतर साहित्य असा एकूण २३ लाख ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात शांतीनगर पोलिसांना यश आले आहे.अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड करीत आहेत.