भिवंडी लोकसभा मतदारसंघात तीन महिन्यात 78,  हजार 859 मतदारांची वाढ

भिवंडी

20 लाख मतदान मतदानाचा हक्क बजावणार

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी लोकसभा मतदार संघात मतदार नाव नोंदणीसाठी 23 एप्रिल पर्यंत वेळ वाढवून दिल्याने या संधीचा फायदा घेत या तीन महिन्यांच्या काळात 23 भिवंडी लोकसभा मतदार क्षेत्रात सुमारे 78 हजार 859 मतदारांनी नाव नोंदणी केली त्यामुळे आता  एकूण 20 लाख 87 हजार 244 मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.अशी माहिती भिवंडी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली आहे.
      23 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली मतदानाची आकडेवारी सुमारे 20 लाख 8 हजार 521 होती.त्यानंतर 23 एप्रिल पर्यंत मतदार नोंदणी करण्यात आली.सुधारित मतदार यांची संख्या भिवंडी ग्रामीण मध्ये एकूण 3 लाख 23 हजार 977 मतदार, शहापूर मध्ये 2,
लाख 79 हजार ,137, भिवंडी पश्चिम 3 लाख 4 हजार 859, भिवंडी पूर्व 3 लाख 36 हजार 110 कल्याण पश्चिम विधानसभा 4 लाख 138 तर मुरबाड 4 लाख 42 हजार 922  मतदारांची नोंद झाली. यामुळे एकूण पुरुष मतदार 11 लाख 29 हजार 714, स्त्री मतदार 9 लाख 57 हजार191 तर तृतीय पंथीय मतदार 339 असे एकूण 20 लाख 87 हजार 244 मतदार आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *