भिवंडी तालुक्यातील 121 ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत संपन्न..

भिवंडी


राजकीय पक्षाच्या कार्यकर्तेची गर्दी.

भिवंडी (प्रतिनिधी) भिवंडी तालुक्यातील १२१ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीच्या आरक्षणाची सोडत  मंगळवारी दुपारी शहरातील कामतघर येथील महा पालिकेच्या वऱ्हाळ माता मंगल कार्यालय याठिकाणी उपविभागीय अधिकारी अमित सानप यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार अभिजित खोले यांच्या नेतृत्वाखाली पार पडली यावेळी भाजप,काँग्रेस, शिवसेना,महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस सह विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पिंपळघर राजनोली,दिवे केवणी,मालोडी,खारबाव,काल्हेर,पायगाव,खांडपे – चिंचवली,दिवे अंजूर,लाप,
गुंदवली,महापोली,
लोनाड,सवाद, वेहळे,
पूर्णा,सोनाळे,डुंगे,वांद्रे,
सुरई सारंग,वडवली,
बोरिवली तर्फे राहुर,
केवणी पिंपळनेर या ग्रामपंचायती सरपंच सर्व साधारण पदासाठी आरक्षित झाल्याने पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.


     भिवंडी तालुक्यातील ४० ग्रामपंचायती या अनुसूचित क्षेत्रात समाविष्ट असल्याने उर्वरित ८१ ग्रामपंचायतींपैकी ६ अनुसूचित जाती,८ अनुसूचित जमाती,२२ नागरिकांचा मागास प्रवर्ग,तर उर्वरित ४५ या सर्वसाधारण यांच्या साठी राखीव असून यामध्ये २२ सरपंचपद ही महिलांसाठी राखीव आहेत तर अनुसूचित क्षेत्रातील ४० पैकी २० सरपंच पदे ही सुध्दा महिलांसाठी राखीव असणार आहेत.ही सरपंच आरक्षण सोडत पार पाडण्यासाठी नायब तहसीलदार विशाल इंदुलकर,किरण केदार,
अतुल नाईक,संतोष आगिवले,शैलेश भोजने,निवडणूक विभागाचे मेजर पवार यांनी मेहनत घेतली.तर या सोडत प्रकरणी उत्सुकता ताणलेली असताना विविध गावातील राजकीय पक्षांचे इच्छुक उमेदवारांनी उपस्थित लावली होती.

चौकट
सरपंच पद आरक्षण सोडत प्रवर्ग निहाय खालील प्रमाणे

अनुसूचित जाती महिला – वडघर,भोकरी,कोन

अनुसूचित जाती सर्वसाधारण –
 पडघा, वडपे,कवाड,
अनुसूचित जमाती महिला –  कुकसे, सावंदे, लामज ,आलीमघर,

अनुसूचित जमाती सर्वसाधारण – 
कुरुंद,किरवली तर्फे खंबाळे,नांदकर सांगे, सापे 
इतर मागासवर्गीय महिला –  राहूर,खंबाळे,
जुनांदुरखी,डोहळे,
ओवळी,पिंपळास,
कशेळी,भरोडी,
कांदळी,सरवली,

इतर मागासवर्गीय सर्वसाधारण – 
निंबवली, भादाणे,
बापगाव, गोरसई,
कालवार,काटई,राहनाळ,
धामणगाव,अंजूर, कारिवली,वळ 

सर्वसाधारण महिला – 
चावे,शेलार,आवळे, 
तलवली अर्जुनली,पुंडास,
कोशिंबे,पिसे,मोरणी,
भिनार, खोणी, कासणे,वडुनवघर,
खालिंग बुद्रुक,
कुसापूर,निवळी, आमणे,अनगाव,गोवे,
कोपर,मानकोली,
खानिवली,खांडवळ

सर्वसाधारण – पिंपळघर राजनोली,दिवे केवणी,मालोडी,
खारबाव,काल्हेर,पायगाव,खांडपे चिंचवली,
दिवेअंजूर,लाप,
गुंदवली,महापोली,
लोनाड,सवाद, वेहळे,पूर्णा,सोनाळे,
डुंगे,वांद्रे,सुरई सारंग,वडवली,
बोरिवली तर्फे राहुर,केवणी पिंपळनेर,

अनुसूचित ( पेसा ) क्षेत्रातील ग्रामपंचायती
अनुसूचित जमाती महिला –
ब्राह्मणगाव,गणेशपुरी,
वज्रेश्वरी,महाळुंगे,अस्नोली,मालबिडी सूर्यानगर,
सुपेगाव,पालखणे,
एकसाल,दुधनी,कुंदे,
झिडके,पहारे,चाणे, दिघाशी,पच्छापूर,मोहंडुळ,चिंबीपाडा,कुहे,पारीवली

अनुसूचित जमाती सर्वसाधारण – 
अकलोली,घोटगाव, दुगाड,मोहिली,
नांदीठणे,पिळंझे, मैंदे,वेढे,वारेट,
खरिवली शेडगाव,
चिंचवली तर्फे कुंदे,
अंबाडी,दाभाड,केल्हे,शिरोळे,पाये,खडकी,गाणे फिरिंगपाडा, लाखिवली, कांबे अशा विविध ग्रामपंचायत ची सोडत काढण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *