भिवंडीतील संकेत भोसले हत्याकांड रिपब्लिकन सेनेचा भिवंडी प्रांत कार्यालयावर आक्रोश मोर्चा

भिवंडी



भिवंडी (भानुदास भसाळे)संकेत भोसले हत्याकांडाच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंगळवारी दुपारी शहरातील कामतघर ते उपविभागीय कार्यालयावर भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात हजारो महिला,नागरिक व युवक सहभागी झाले होते.यावेळीप्रांताधिकारी यांना हत्याकांडातील आरोपींवर कडक कारवाई करावी याबाबत निवेदन देण्यात आले १४ फेब्रुवारी रोजी भिवंडीतील कामतघर भागातील वराळदेवी येथे राहणारा संकेत भोसले या शालेय विद्यार्थीस बेदम मारहाण झाली होती.

या मारहाणीत मुंबई केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.मृत्यूनंतर आंबेडकरी समाजात तीव्र असंतोष पसरला असून संकेत भोसले यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी या मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष व संघटनांच्या वतीने आंदोलने व मोर्चा काढण्यात येत आहेत.या प्रकरणातील १४ आरोपींपैकी १२ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.आज दुपारी रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत कामतघर राहुल नगर बुद्ध विहार ते भिवंडी उपविभागीय कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात घेण्यात यावे, आरोपींवर मोक्का अंतर्गत इतर विविध कलमअंतर्गत गुन्हे दाखल करावेत, दलित वस्त्यांना संरक्षण देण्यात यावे अशा मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी कार्यालयात देण्यात आले.यावेळी बौद्ध पंचायत समितीच्या सहा शाखांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *