भिवंडी महापौरांची नालेसफाईची घोषणा हवेत,..

भिवंडी

नगरसेवकां मध्ये नालेसफाई कामावरून वरून नाराजी..

भिवंडी (प्रतिनिधी) भिवंडी शहरातील तीन वर्षे प्रशासकीय काळातील गटार व नाले सफाई कामे नेहमीप्रमाणे वादात सापडली आहे.
लोकप्रतिनिधी नगरसेवक निवडून आल्या नंतर आता नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत,पावसाळा तोंडावर असताना मे महिन्याच्या शेवटच्या पंधरवाड्यात सुरू झालेली नाले सफाई कामे अद्याप पूर्ण होऊ शकत नाही.त्यामुळे महापौर नारायण चौधरी यांनी गाजावाजा करीत काही ठिकाणी नाले सफाई काम पाहून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना फैलावर घेत तातडीने नालेसफाई कामे व्यवस्थितपणे करा असे निर्देश दिले मात्र त्यांनी सफाई कामा बाबत केलेली घोषणा भ्रमनिरास करणारी असल्याचे सांगत या नालेसफाई वर प्रभाग समिती क्रमांक – 5 भाजपचे सभापती अँड.वैभव भोईर व अन्य नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे.प्रभाग समिती क्रमांक पाच मधील नालेसफाईच्या कामाची पाहणी सभापती अँड. वैभव भोईर,नगरसेवक अँड.मयुरेश पाटील,नेहा काठवले,रोमा आळशी,
मलिक मोमिन यांच्यासह पालिकेच्या काही कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन प्रभागातील नालेसफाईच्या पाहणी करून त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नालेसफाई व स्वच्छता संदर्भात नाराजी व्यक्त केली.


पावसाळा तोंडावर असताना भिवंडी शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असून आतापर्यंत केवळ सुमारे ३० ते ४० टक्के नालेसफाई पूर्ण झाल्याचा आक्षेप घेत सफाई कामा संदर्भात नाराजी व्यक्त करून शहरात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास

सर्वस्वी आयुक्त प्रशासन व ठेकेदार जबाबदार राहतील असा इशारा अँड. वैभव भोईर यांनी दिला आहे.प्रभाग समिती क्रमांक पाच चा परिसर हा शहराचा शेवटचा भाग असून या ठिकाणी शहरातील बहुसंख्य गटार व नाले खाडीला मिळतात परंतु येथील गटार व नालेसफाई न झाल्यास या भागात अनेक ठिकाणी दरवर्षी पाणी तुंबल्याने पूरजन्य परिस्थिती निर्माण होत असते त्यामुळ नागरिकांचे जीवित व वित्त हानी मोठ्या प्रमाणावर होते,यंदाही योग पध्दतीने नालेसफाई न झाल्यास शहरात पुरजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला,मनपा महापौर नारायण चौधरी यांनी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण करून घेणार अशी घोषणा केली होती, मात्र ती हवेत विरली असल्याचा मत अँड.वैभव भोईर यांनी व्यक्त केले आहे.आयुक्त प्रशासनाने पावसाळ्या पूर्वी गटार व नालेसफाईची कामे पूर्ण करून घेणे अपेक्षित असून शहरात पाणी साचून नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी कंत्राटदार ठेकेदाराने तातडीने कामाचा वेग वाढवावा, ठेकेदारांनी समाधानकारक काम न केल्यास संबंधित ठेकेदाराला बिल देऊ नये अशी मागणी अँड भोईर यांनी आयुक्तां कडे केली आहे.


नाले सफाईचे काम करतांना कंत्राटदारा सोबत मनपाचे आरोग्य व स्वच्छता विभाग प्रमुख, निरीक्षक तसेच बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंता आणि प्रभाग अधिकारी हजर राहणे आवश्यक आहे. मात्र ते कुठेही हजर नसल्याने गटार व नाले सफाईचे काम योग्य प्रकारे होत नसल्याचे आढळून येत आहे. यंदा मनपा गटार नाल्यावर दोन कोटी ४४ लाख रुपये खर्च करणार आहे, त्यामुळे नाले सफाईचे काम योग्य पध्दतीने होणे आवश्यक आहे असे मत नगरसेवक व्यक्त करीत आहेत. तर सुमारे 44% नालेसफाई झाल्याची माहिती आरोप व स्वच्छता विभागाचे प्रमुख फैजल तातली यांनी दिली आहे.