भिवंडीतील इस्कॉन राधा कृष्ण मंदिरात भव्य “आंबा महोत्सव” संपन्न..

भिवंडी

दहा हजाराहून अधिक भाविकांनी घेतले दर्शन..


भिवंडी ( शरद भसाळे ) भिवंडी शहरातील सुप्रसिद्ध मानसरोवर हरे कृष्ण हिल येथील भगवान श्री श्री राधा कृष्ण (इस्कॉन) मंदिरात आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ व मंदिर प्रमुख
श्री सुदामा प्रभू महाराज व चंद्रकांत प्रभू महाराज यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकाराने भव्य “आंबा महोत्सव” आयोजित करण्यात आला होता,या निमित्ताने महाआरती व धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने भक्तिमय वातावरणात संपन्न झाले.या दिव्य महोत्सवात सुमारे दहा हजाराहून अधिक महिला व भाविक सहभागी होत श्री श्री राधा कृष्ण यांचे विशेष दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.


या महोत्सवा निमित्त भगवान श्रीकृष्ण मंदिर परिसरात विविध प्रकारच्या आंब्यांनी आकर्षक भव्य सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आली होती,भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न करण्यासाठी महाआरती करून फळांचा राजा “आंबा” विशेषरूपाने अर्पण करण्यात आला. भारतीय वैदिक संस्कृतीमध्ये भगवानांना सर्वोत्तम वस्तू अर्पण करण्याची प्राचीन परंपरा आहे. त्याच भावनेतून राजाधिराज श्री श्री राधा कृष्ण यांना “फळांचा राजा आंबा” अर्पण करून हा दिव्य उत्सव साजरा करण्यात आला.महोत्सव निमित्ताने रविवार (दि.31 )पहाटे पासून भक्तांसाठी दिव्य दर्शन, हरिनाम संकीर्तन व आध्यात्मिक,धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.सुमारे दहा हजाराहून अधिक महिला व नागरिकांनी यावेळी उपस्थित होते,रात्री ८:३० नंतर भगवानांना अर्पण करण्यात आलेल्या आंब्यांचा प्रसाद व भोजन उपस्थित सर्व भाविकांना वितरित करण्यात आला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीमंदिर प्रमुख श्री सुदामा प्रभू महाराज,श्री चंद्रकांत महाराज यांच्या स्वयंसेवक व सहकाऱ्यांनी विशेष मेहनत उपस्थित भाविकांचे आभार मानले.