मालमत्ताधारकांकडे पालिकेची ११०० रूपयांची थकबाकी ??
भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर महानगर पालिका आयुक्त प्रशासन नागरिकांकडून मालमत्ता कर आणि थकबाकी असलेली वसुली करण्यास अपयश ठरली आहे.
कोट्यवधी रुपयांची मालमत्ता कर नागरिकांकडे थकबाकी आहे,सध्या मालमत्ता कर वसुली ही अत्यंत कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या विकास कामावर त्याचा परिणाम होत आहे.
त्यामुळे आता मालमत्ता कर वसूल करण्यासाठी कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे.त्यासाठी येत्या ७ ते ३१ डिसेंबर या दरम्यान थकीत मालमत्तांवरील व्याजामध्ये शंभर टक्के सूट देणारी ” अभय योजना ” मनपाचे माध्यमातून राबवली जाईल.तरीही मालमत्ता कर वसुली झाली नाही तर मालमत्ताधारकांकडून मालमत्ता कर वसुलीसाठी विद्युत पुरवठा खंडित,नळ कनेक्शन कटींग व मालमत्ता जप्त सारखी कठोर कारवाई केली जाईल असा इशारा महापौर नारायण चौधरी यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिले आहे.
भिवंडी महापालिकेची सुमारे ११०० कोटी रुपयांची मालमत्ता कर ग्राहकांकडे सध्या थकीत
असल्याची माहिती त्यांनी दिली,पैकी यंदा सुमारे शंभर कोटी रूपये वसूल करण्यात आले आहेत, मागणी ३०० कोटी असताना अनेक ठिकाणी वसुली कामात महापालिका प्रशासनाकडून कसुरी होत असल्याने शहराच्या विकास कामाला खीळ बसत आहे,मनपाकडे निधी नसल्याने लोकप्रतिनिधी नगरसेवक आपल्या प्रभागात साधे गटार सुद्धा बनवू शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.या गंभीर प्रकाराला महापालिका प्रशासन पालिका जबाबदार असून मालमत्ता कर थकबाकी वसुली करण्यासाठी आता मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर त्याच बरोबर मालमत्ताधारकांवर कठोर कारवाई करण्याची वेळ आल्याची माहिती महापौर नारायण चौधरी यांनी दिली.शहरातील नागरिक वीज पुरवठा खंडित होईल या भितीने टोरंट पॉवर कंपनीचे वीजबिल ग्राहक न चुकता वेळेत भरतात मात्र महापालिकेचा मालमत्ता कर वेळेत भरण्यासाठी टाळाटाळ करतात त्यामुळे ही गांभीर्याने विचार करायला लावणारी बाब आहे असे मत महापौर चौधरी यांनी व्यक्त केले आहे.
प्रशासनाने व्यावसायिक मालमत्ता कर वसुली ठेकेदारा मार्फत करण्याचा प्रस्ताव आणला आहे.सर्व लोकप्रतिनिधींचा त्याला विरोध असल्याने लोकभावना लक्षात घेऊन तो प्रस्ताव मागे घेतला जाईल असे सांगत थकीत मालमत्ता कर वसुली साठी दिलेल्या अभय योजने नंतर प्रशासनातर्फे कठोर जप्तीची कारवाई करण्यास सुरुवात केली जाईल याचे गांभीर्य नागरिकांनी लक्षात घ्यावे.यावेळी कोणताही लोकप्रतिनिधी जप्ती कारवाई मध्ये हस्तक्षेप करणारा नाहीत.शहर विकासासाठी शहरातील नागरिकांच्या सहभागासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी आग्रही असून त्यासाठी मालमत्ता कर वसुली आवश्यक असून आता थकीत मालमत्ता धारकांची कोणतीही गय केली जाणार नाही असा इशारा शेवटी महापौर नारायण चौधरी यांनी दिला आहे.

