काँग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेना पक्षाचेवतीने पुष्पहार अर्पण करून भव्य मिरवणूक
भिवंडी (शरद भसाळे) शासन आदेशा नुसार भिवंडी
महापालिके च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पालिका आयुक्त अजय वैद्य यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.तर शहरातील शिवसेना शाखा कामतघर येथे शिवसेनेचे माजी उपमहापौर मनोज काटेकर यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेची पालखी सोहळा काढून भव्य वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती.यामध्ये शेकडो शिवप्रेमी नागरिक व महिला वर्ग सहभागी झाला होते.तसेच नगरसेविका वंदना काटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वकृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा व भजन प्रवचन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.प्रसंगी परिसरात विद्युत रोषणाई करून आरास करण्यात आली होती.अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके, संजय हिरवडे,उपायुक्त प्रणाली घोंगे,रमेश थोरात,अजित महाडिक,शिक्षण अधिकारी उपेंद्र संभारी यांच्या सह पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी शिवराज्याभिषेक चित्राचे देखील आयुक्तांचे हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी ढाल तलवार, दानपट्टा यांचे सादरीकरण केले तसेच काँग्रेस पक्षाचे शहरध्यक्ष रशिद ताहीर मोमीन, माजी खासदार सुरेश टावरे,माजी नगरसेवक तारीक फारूखी,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुरेंद्र मुळे,हारून खान यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.सकल मराठा समाजाचेवतीने सुध्दा अजय नगर येथील समाज कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून वाजतगाजत मिरवणूक काढून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.शिवसेना शहरप्रमुख सुभाष माने, मराठा समाज अध्यक्ष साईनाथ पवार,अशोककुमार फडतरे, दिपक कदम, भूषण रोकडे,प्रविण पाटील,विराज पवार,राजू गोलांडे यांच्या सह शेकडो शिवप्रेमी नागरिक सहभागी झाले होते.