भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक व स्व.मीनाताई ठाकरे रंगायतन नूतनीकरण कामाची सभापती, नगरसेवकांनी केली पाहणी

भिवंडी

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहरातील नझराणा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेला
छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा व ठाणगे आळी येथील स्व.मीनाताई ठाकरे रंगायतन या दोन्ही वास्तू निगा व दुरुस्ती न राखल्याने नादुरुस्त झाल्याने जीर्ण वास्तूंचे नूतनीकरण करण्याचे काम महापालिकेच्या कंत्राटदार मार्फत गेल्या काही वर्षांपासून रखडलेले आहे.महापौर व आयुक्त यांनी आदेश देऊन सुध्दा कंत्राटदाराने त्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे नागरिकां मध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे ही बाब लक्षात घेऊन सध्या
या कामाच्या परिस्थितीची माहिती करून घेण्यासाठी प्रभाग समिती क्रमांक पाच चे सभापती अँड वैभव भोईर यांच्या नेतृत्वाखाली लोकप्रतिनिधींनी या दोन्ही ठिकाणी भेटी देऊन कामाचा आढावा घेतला आहे.या पाहणी प्रसंगी शिवसेनेचे माजी आमदार रुपेश म्हात्रे,स्थायी समिती सदस्य अँड.मयुरेश पाटील,जेष्ठ नगरसेवक निलेश चौधरी, शाफ मोमिन,बांधकाम विभागाचे अभियंता सचिन नाईक, उप अभियंता विनोद मते, प्रभाग अधिकारी गिरीष घोष्टेकर,नेहा काठवले,नवीन काठवले,पप्पू राका, शिवसेना पूर्व विधानसभा शहर प्रमुख संजय काबूकर व मान्यवर उपस्थित होते.


स्व.मीनाताई ठाकरे रंगायतन २०१७ पासून नादुरुस्त झाल्याने बंद होते.तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रंगायतनच्या दुरुस्ती कामा साठी १५ कोटी रुपये मंजूर केले.त्यामुळे या दुरूस्तीवर कोट्यवधी रुपये खर्च करून सुध्दा हे काम निधी अभावी ठप्प झाले आहे. आता पर्यंत सुमारे ५७ टक्के निधी पालिकेस प्राप्त झाला असून २० टक्के ठेकेदाराला देण्यात आले आहेत.परंतु काम अपूर्ण आहे,त्यामुळे आयुक्त अनमोल सागर,महापौर नारायण चौधरी यांनी काही महिन्यापूर्वी या भेट देत कामांची पाहणी करून एक महिन्यात काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. परंतु ठेकेदारांने त्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याने हे काम मोठ्या प्रमाणावर अपूर्ण आहे.सदर रंगायतन दुरुस्ती ठेकेदारास तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.तर छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा ठिकाणी काही प्रमाणात प्रगती
पथावर आहे. होणारे काम दर्जेदार व उच्च प्रतीचे व्हावे अशी मागणी सभापती अँड. भोईर व स्थायी समिती सदस्य अँड. मयुरेश पाटील यांनी केली आहे.महापालिका वास्तू उभारते पण त्याच्या निगा व दुरुस्तीकडे पाठ फिरवते म्हणून आपल्या शहरातील स्मारक व वास्तू जीर्ण होत आहेत अशी खंत माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी व्यक्त केली.
छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा येथील काम बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे.तर रंगायतन येथील काम जलद होण्यासाठी ठेकेदाराने अधिक मेहनत घेण्याची गरज आहे अशी माहिती सभापती अँड वैभव भोईर,मयुरेश पाटील यांनी दिली, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही वस्तुंसाठी दिलेल्या निधीतून दर्जेदार वास्तू साकारणे गरजेचे आहे त्यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे अशी अपेक्षा अँड.मयुरेश पाटील यांनी व्यक्त केली आहे. दिली.