भिवंडी महानगरपालिका लवकरच नागरिकांच्या सोयीसाठी १०० इलेक्ट्रिक प्रवासी बस चालवणार..

भिवंडी

 भिवंडी: (भानुदास भसाळे) भिवंडी शहर परिसरात महानगर पालिका प्रशासनाची ” सीटी बस ” सेवा नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते गेल्या अनेक वर्षापासून महापालिका प्रशासन अर्थसंकल्पामध्ये बस सेवा सुरू करणार असे आश्वासन देत होती मात्र त्याची पूर्तता होत नव्हते मात्र आता केंद्र सरकारच्या सहकार्याने महानगरपालिके मार्फत भिवंडी शहरात सिटी बस (प्रवासी बस) चालवण्याचे नागरिकांचे स्वप्न आणि प्रतीक्षा लवकरच पूर्ण होणार आहे.असल्याची माहिती महापालिका आयुक्त प्रशासनाने दिली आहे.
भिवंडी नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर होऊन २१ वर्षे झाली,आजपर्यंत ६५० कोटी रुपयांचे बजेट असलेल्या भिवंडी महानगर पालिका प्रशासनाला भिवंडीवासीयांच्या सोयीसाठी प्रवासी बस सेवा योजना सुरू करता आलेली नाही.मात्र, आता लवकरच भिवंडी महापालिकेच्या स्वत:च्या ५० लहान आणि ५० मोठ्या बसेस अशा एकूण १०० इलेक्ट्रिक बसेस धावणार आहेत. केंद्र सरकारकडून या सर्व बसेस महापालिकेला मोफत मिळणार आहेत.त्यासाठी महापालिका प्रशासनाला शहरात केवळ अर्धा डझन चार्जिंग स्टेशन उभारावे लागणार आहेत. या संदर्भात महापालिका आयुक्त अजय वैद्य यांनी तीन शहरांना जोडणारी बससेवा कार्यान्वित करण्याच्या योजनेवर काम सुरू केले असल्याची माहिती दिली. ही बससेवा सुरू केल्याने महापालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत तर वाढणारच शिवाय शहरवासीयांना स्वस्त प्रवासाचा लाभ मिळण्याबरोबरच वाहतुकीची सोयही वाढणार आहे.या योजनेच्या संदर्भात माहिती देताना भिवंडी महानगर पालिकेचे आयुक्त अजय वैद्य सांगितले की, महापालिका प्रशासन स्वत:च्या १०० इलेक्ट्रिक बसेस चालवणार आहे. त्यासाठी गेल्या चार महिन्यांत केंद्र सरकारच्या परिवहन विभागाशी समन्वय साधून त्याची मंजुरी तर घेतलीआहे. त्या शिवाय केंद्र सरकार या सर्व बसेस महापालिकेला मोफत देत आहेत. ती चालवण्यासाठी पालिकेची गरज आहे. महापालिकेने तयार केलेल्या नवीन डीपी प्लॅनमध्ये बसेस धावण्यासाठी चार्जिंग स्टेशन बनवण्यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. जेथे योग्य चार्जिंग स्टेशन तयार करण्याचा उपक्रम सुरू आहे. महापालिकेने स्वत:च्या बसेस सुरू केल्यास पालिकेची आर्थिक स्थिती सुधारेल असे नाही, तर भिवंडीचा नजीकच्या सर्व शहरांशी संपर्कही वाढेल. 
सध्या शहरात येणाऱ्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि ठाणे महापालिकेच्या बसेसमुळे  शहरातील आणि शहराबाहेरील  नागरिक,विद्यार्थी व इतर लोक ये-जा करतात. व्यावसायिकांना प्रवासाची सोय होऊ लागली. वेळेची बचत झाली आणि त्या पालिकेला आर्थिक लाभही मिळाला. तर परिवहन महामंडळाच्या बसेस देखील शहरातील विविध ठिकाणापासून सुरु आहेत. तरी देखील ठराविक वेळेत मोठ्यासंख्येने शहरातील नागरिक खाजगी वाहनातून प्रवास करीत आहेत. या नवीन बसेसमुळे अशा सर्व नागरिकांची सोय होईल त्याच बरोबर शहरातील दुचाकीचे प्रमाण देखील कमी होण्याचे संकेत नागरीकांकडून मिळत आहेत. तसेच या नवीन बसेसमुळे शहर परिसरात प्रदूषणही होणार नाही.शहर विकासासाठी तयार करण्यात येणाऱ्या आगामी डीपी प्लॅनमध्ये परिवहन सेवेचाही समावेश करण्यात आला असून, त्याअंतर्गत उल्हासनगरसह भिवंडी, कल्याणमध्ये समिती स्थापन करून बससेवा सुरू करण्याचे नियोजन सुरू असून तो अहवाल लवकरच राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर या तिन्ही शहरांना बससेवा उपलब्ध होणार असून, सध्या कल्याण स्थानक ते शिवाजी चौक (एसी बस) आणि धामणकर नाका अशी कल्याण महानगरपालिका चालवल्या जाणाऱ्या बससेवेचा लोकांनी वापर करावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *