भिवंडी – भिवंडी शहरातील स्व.महादेव चौघुले महाविद्यालय संचालीत इंद्रपाल चौघुले लाँ काँलेज महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभाग घेऊन पारितोषिक मिळवली.

चौघुले महाविद्यालयात लाँ (कायदा) चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कलागुणांना वाव देण्यासाठी प्राचार्य गायत्री पाटील यांच्या संकल्पनेतून तीन दिवस मनोरंजनात्मक खेळ,नृत्य स्पर्धा गायन स्पर्धा,शायरी, मेहंदी, रांगोळी, कविता पारंपरिक पोषाख,कँरम, बुद्धिबळ असे विविध इनडोर व आउट डोअर स्पर्धा घेण्यात आल्या, त्यामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्याचा कार्यक्रम सभागृहात आयोजित करण्यात आला होता यावेळी विशेष अतिथी म्हणून महाविद्यालयाचे सचिव सुभाष चौघुले,अध्यक्ष इंद्रपाल चौघुले,प्राचार्य गायत्री पाटील अदि मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली.खेळामध्ये प्राविण्य मिळवल्या बद्दल यावेळी चौघुले यांनी त्यांचे अभिनंदन केले. विधीशास्त्र (कायद्या) चा चांगला अभ्यास करून आपल्या जीवनात उज्वल कीर्तीरूपी व्हा,लोकांना न्यायीक मदत करा असे आवाहन महाविद्यालयाचे सचिव सुभाष चौघुले यांनी यावेळी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रो.विठ्ठल दिवेकर,
गणेश दळवी,वीणा कोंडा,संतोष मित्तल,सयाली ठाकुर यांच्या सह महाविद्यालयाचे कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.कार्यक्रम सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन अंजली स्वामी,जतीन स्वामी व राज जनयानी यांनी केले.